पीएचडीची मौखिक परीक्षा हवी असेल तर ६० हजार मोजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 02:49 AM2020-08-17T02:49:43+5:302020-08-17T06:56:36+5:30

पीएच.डी.चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यास अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास ४० हजार रुपये देण्याचा सल्ला दिला.

If you want an oral exam for Ph.D., count 60,000 | पीएचडीची मौखिक परीक्षा हवी असेल तर ६० हजार मोजा!

पीएचडीची मौखिक परीक्षा हवी असेल तर ६० हजार मोजा!

googlenewsNext

राम शिनगारे 
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या सामाजिकशास्त्राच्या अधिष्ठातांनीच स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यास अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास ४० हजार रुपये देण्याचा सल्ला दिला. त्याची आॅडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.
राहणे, जेवणासाठी अतिरिक्त २० हजार रुपये मागण्यात आले. त्याशिवाय परीक्षाच घेणार नसल्याचे स्पष्ट केले. हा संशोधक विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण असून आठ हजार रुपयांवर विनाअनुदानित महाविद्यालयात अध्यापन करतो. राज्यशास्त्र विभागातील या विद्यार्थ्यासाठी परभणी जिल्ह्यातील बहिस्थ परीक्षकाची वेळ तीन वेळा घेण्यात आली. मात्र, पैसे मिळाले नसल्यामुळे तीनही वेळा व्हायवा रद्द करण्यात आली. मार्गदर्शक तथा अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा विषय राजकीय झाला असून, प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.
चहाची टपरी टाकावी वाटते
बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तरचे शिक्षण, एम.फिल. आणि पीएच.डी.चे संशोधन केले. हे क्षेत्र सोडून चहाची टपरी टाकावी. पुन्हा याकडे येऊ नये, असे वाटत असल्याचे संशोधक विद्यार्थ्याने सांगितले.

Web Title: If you want an oral exam for Ph.D., count 60,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.