शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
4
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
5
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
6
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
7
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
9
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
10
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
11
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
12
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
13
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
15
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
17
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
18
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
19
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
20
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
Daily Top 2Weekly Top 5

चोर पकडले, तर पोलीस ठाण्यात आणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST

वाळूज महानगर : वाळूजला सोमवारी रात्री दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही ...

वाळूज महानगर : वाळूजला सोमवारी रात्री दुचाकीतून पेट्रोल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना दक्ष नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. ही माहिती पोलीस ठाण्यात दिल्यानंतर ठाणे अंमलदाराने ‘चोर पकडले, तर तुम्हीच पोलीस ठाण्यात आणून सोडा’ असे अजब फर्मान सोडल्याने नागरिकांनी चोरट्यांना सोडून दिले.

सध्या पोलीस दलाच्या वतीने ‘दक्ष नागरिक- सुरक्षित परिसर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांत जनजागृती केली जात आहे. या उपक्रमांतर्गत वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी नागरिकांत जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली. वाहने चोरी होण्याची शक्यता असल्याने ती संरक्षक भिंतीच्या आत लावा, वाहनाला जीपीएस सिस्टीम लावा, दुचाकीला लॉक, साखळदंड लावा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असलेल्या ठिकाणीच वाहने उभी करा आदींविषयी पोलीस प्रशासनातर्फे व्हॉटस्‌ॲप व सोशल मीडियामधून जनजागृती केली जात आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या जनजागृती अभियानाला पोलीस कर्मचारी हरताळ फासत असल्याची प्रचीती वाळूजच्या नागरिकांना सोमवारी रात्री आली. येथील अविनाश कॉलनीत सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पाच ते सहा किशोरवयीन चोरटे हातात पेट्रोलच्या कॅन घेऊन जाताना दक्ष नागरिकांना दिसले. संशय आल्याने दोन तरुणांनी पाठलाग करून त्या दोन चोरट्यांना पकडले असता त्यांनी दुचाकीमधून पेट्रोल चोरल्याची कबुली दिली. गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकीतील पेट्रोलची चोरी होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी या दोघा चोरट्यांना चोपही दिला.

या मग ठाण्यात

चोरट्यांना पकडल्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून या चोरट्यांना जमाव मारहाण करीत असल्याने पोलीस पाठविण्याची विनंती केली. मात्र, ठाणे अंमलदार पोहेकॉ. विष्णू चाटे यांनी पोलीस ठाण्यात कुणीच नसून अधिकारी व कर्मचारी गस्तीवर गेल्याचे सांगितले. पुन्हा अर्ध्या तासाने नागरिकांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधला. मात्र, दुसऱ्यावेळी ठाणे अंमलदार चाटे यांनी तुम्हीच चोरट्यांना पोलीस ठाण्यात घेऊन या, असा अनाहूत सल्ला दिला. नागरिकांनी नंतर मात्र दोघा चोरट्यांना सोडून दिले. यानंतर तासाभराने सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, चालक किरण खिल्लारे, पोहेकॉ. नारायण लघाने घटनास्थळी आले, घटनास्थळी आलेले चालक पोहेकॉ. खिल्लारे यांनीही नागरिकांची उलटतपासणी करीत चोरट्यांना सोडून दिले, तर आम्हाला कशाला बोलावले, असे म्हणत नागरिकांशी वाद घातला. सहायक निरीक्षक कंकाळ यांनी वाद मिटविला.

----------------------------