शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची इच्छा असेल तर निवडणूक लढवू

By admin | Updated: August 17, 2014 00:53 IST

जनतेची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवू, असे भाऊराव कारखान्याच्या उपाध्यक्षा अमिताताई चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील कार्यक्रमामध्ये सांगितले.

भोकर : भोकरचे प्रतिनिधित्व करणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आता लोकसभेत खासदार आहेत. त्यामुळे भोकरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कार्यकर्ते व मतदारांमधून आपल्या नावाचा आग्रह धरला जात आहे. जनतेची इच्छा असेल तर आपण निवडणूक लढवू, असे भाऊराव कारखान्याच्या उपाध्यक्षा अमिताताई चव्हाण यांनी मुदखेड तालुक्यातील कार्यक्रमामध्ये सांगितले.मुदखेड तालुक्यातील पाथरड रेल्वेस्टेशन, हिस्सा पाथरड, सरेगाव, इजळी येथे विविध कार्यक्रम झाले. यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमदार अमरनाथ राजूरकर, ‘भाऊराव’ चे चेअरमन गणपतराव तिडके, तालुकाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, जि.प. सदस्या प्रतिभाताई देशमुख, उपसभापती सुनील देशमुख, बाळासाहेब देशमुख, ‘भाऊराव’चे संचालक दत्तराम अवतिरक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांची उपस्थिती होती. अमिताताई चव्हाण म्हणाल्या, भोकर मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला. दिवंगत नेते, देशाचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठे मताधिक्य देवून विजयी करण्याचा इतिहास रचला. देशात काँग्रेससाठी प्रतिकुल परिस्थिती निर्माण झालेली असतानासुद्धा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना जिल्ह्यातील मतदारांनी मोठे मताधिक्य देवून लोकसभेत पाठविले. यापूर्वी भोकर, मुदखेड मतदारसंघात मोठी विकासकामे झाली. यापुढेही हा मतदारसंघ टॉपटेनमध्ये आणण्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु. यावेळी सरचिटणीस आमदार राजूरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यावर समन्वय समितीचे अध्यक्षपद देवून राज्याची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे भोकर मतदारसंघातील जनतेने अमिताताई यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. तालुकाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनीही भाषण केले. कार्यक्रमास सरपंच कैलास अवतारीक, सरपंच संभाजीराव लोकरे, केवळाबाई बोचरे, मोहन बोचरे, प्रकाश येडके, शंकरराव बोचरे, दत्तराव येडके, नामदेवराव भोकरे, संभाजीराव बोचरे आदींची उपस्थिती होती. अमिताताई यांच्या हस्ते सुमारे एक कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ झाला. (वार्ताहर)