आईस्क्रीम विक्रेत्याला गुंडाक डून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 20:33 IST2019-05-04T20:33:30+5:302019-05-04T20:33:49+5:30

पैशांविना आईस्क्रीम देण्यास नकार देणाऱ्या विक्रेत्याला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंडांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावर ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.

Ice Cream Decker Gundak Doon Strikes | आईस्क्रीम विक्रेत्याला गुंडाक डून मारहाण

आईस्क्रीम विक्रेत्याला गुंडाक डून मारहाण

औरंगाबाद : पैशांविना आईस्क्रीम देण्यास नकार देणाऱ्या विक्रेत्याला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंडांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावर ३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.


ज्ञानेश्वर मनोहर यादव, राहुल राणा आणि शुभम जाट अशी आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी येथील प्रभाकर काशिनाथ शेटे हे आईस्क्रीम विक्रीचा गाडा चालवितात. ३ मे रोजी सायंकाळी ते जयभवानीनगर येथील मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याने जात होते त्यावेळी आरोपी त्यांच्याकडे आईस्क्रीम घेण्यासाठी आले.

शेटे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी नकार दिल्याने तिघांनी मारहाण केली. शुभम जाट हा पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. याघटनेनंतर शेटे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस नाईक घुनावत तपास करीत आहे.
 

Web Title: Ice Cream Decker Gundak Doon Strikes