शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

माझी चूक झाली; कायद्यानूसार माझ्यावर नक्की कारवाई करा - इम्तियाज जलील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 4:47 PM

मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी देखील इम्तियाज जलील  यांनी केली आहे.

मुंबई/औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली. (Lockdown in Aurangabad cancelled by District administration)

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार  इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला. इम्तियाज जलील यांच्यावर सर्व स्तरावरुन टीका करण्यात आली. यानंतर इम्तियाज जलील यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. 

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना इम्तियाज जलील म्हणाले की, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायद्या त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

दरम्यान, आधी औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध केला होता. इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती. 

‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत- मनसेचे नेते अमेय खोपकर

MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. हे असे ‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत. कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या असल्या स्टंटबाज नेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार- शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा” अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करु, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद