शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

यशाचा स्वीकार नम्रतेने करायला हवा

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : आपल्या जीवनात यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तीने हे यश आपले एकट्याचे आहे या भ्रमात कधीही राहू नये. प्रत्येक व्यक्तीच्या यशामध्ये अनेकांचा सहभाग असतोच.

औरंगाबाद : आपल्या जीवनात यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तीने हे यश आपले एकट्याचे आहे या भ्रमात कधीही राहू नये. प्रत्येक व्यक्तीच्या यशामध्ये अनेकांचा सहभाग असतोच. यश कधीही एकट्याचे असूच शकत नाही. त्यामुळे यशाचा स्वीकार हा नम्रतेने करायला हवा. आपल्याला सहकार्य करणाऱ्यांची कधीही उपेक्षा करू नका, त्यांच्या उपकारांची जाणीव मनात सतत असेल तरच तुमच्या यशाला नम्रतेची सोनेरी किनार लाभेल आणि हे यश अधिक झळाळून उठेल.यशाबरोबर येणारा अहंकार व्यक्तीच्या अध:पतनाला कारणीभूत ठरतो. उपकारकर्त्याची जाणीव मनामध्ये सातत्याने असेल, तर ‘हे माझे एकट्याचे नाही’ हा भाव जागृत राहून माणूस अधिक नम्र होतो.सृजनाकरिता अनेकांचा सहभाग आवश्यक असतो याचे भान ठेवावे आणि जेथे अनेकांचा सहभाग तेथेच सृजनशीलता असू शकते.आपल्या हातून किती सृजनात्मक कामे झाली आणि किती विध्वंसक कामे झाली, याचा कधीतरी ताळेबंद मांडून पाहा, म्हणजे आपण कोठे आहोत आणि आपल्याला काय करायचे, याची दिशा निश्चिती होईल. आपल्यावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अनेक जण उपकार करीत असतात. काही उपकार लक्षात राहतात, तर काही लक्षात ठेवावे लागतात.या सर्वांपेक्षा उच्च प्रतीची भावना असते ती माता- पित्यांच्या उपकारांची जाणीव असणे. आज याचीच सर्वत्र उणीव दिसते. आपल्याला जन्म देताना आपल्या निकट असलेल्या आई- वडिलांच्या अंतिम समयी आम्ही त्यांच्याजवळ का नसतो, याचा गंभीरपणे विचार करा. आपल्या सुखासाठी आणि आपल्यातील गुणांसाठी आपण अनेकांचा उपकार स्वीकारत असतो. किमान सुखाच्या उपकाराची तरी जाणीव ठेवा.