शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

आर्द्रातही ३८ अंश तापमान

By admin | Updated: June 26, 2014 00:40 IST

नांदेड : रोहिणी, मृग व आता आर्द्रातही उन्हाचे चटके बसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे़ उन्हाची काहिली कायम असल्याने तापमानात निच्चांक होत नसल्याचे चित्र आहे़

नांदेड : रोहिणी, मृग व आता आर्द्रातही उन्हाचे चटके बसत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे़ उन्हाची काहिली कायम असल्याने तापमानात निच्चांक होत नसल्याचे चित्र आहे़ बुधवारी ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदल्या गेले़ आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आर्द्रातही पाऊस पडण्याचे संकेत दिसत नसल्याने निराशा आली आहे़ २२ जून रोजी आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला असून हे नक्षत्र ५ जुलैपर्यंत राहणार आहे़ मृग नक्षत्राने दगा दिल्याने शेतकऱ्यांना आर्द्राचा आधार वाटत होता़ मात्र उन्हाळी वातावरणामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे़ मागील पाच, सहा दिवसांत ३८ अंश सेल्सिअसवर तापमान नोंदल्या गेले आहे़ दुपारच्या वेळी उन्हामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी होत आहे़ उकाड्यामुळे नागरिक घामाघुम होत आहेत़ तर रात्रीच्या वेळी सुसाट वारे वाहत आहेत़ आकाश निरभ्र दिसत असल्याने पाऊस पडण्याचे अंदाज फोल ठरले आहेत़ हवामान विभागाने यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचे अंदाज वर्तविले होते़ मात्र सर्व तज्ज्ञांचे अंदाज चुकीचे ठरले आहेत़ शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी मे महिन्यातच नियोजन केले होते़ घरातील वस्तु गहाण ठेवून प्रसंगी विकून शेतकऱ्यांनी बी- बियाणांची सोय केली होती़ मृगाच्या पावसावर पेरणी करण्याचे स्वप्न मात्र पूर्ण झाले नाही़ त्यातच आर्द्रातही उन्हाळाच पदरी आल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ गतवर्षी शेतकऱ्यांनी मृगाच्या पावसावर पेरण्या केल्यामुळे आर्द्रात पिकांची वाढ चांगली झाली होती़ मात्र मशागत करून ठेवलेल्या शेतात अद्याप पेरणी न झाल्यामुळे हिरवाई दिसत नाही़ (प्रतिनिधी)