शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकास अंतर्गतच्या बसेस पुन्हा शाळेच्या वाटेवर

By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड सोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषत: मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसेस

श्रीनिवास भोसले, नांदेडसोमवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषत: मुलींना शाळेत ये-जा करण्यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या बसेस उन्हाळी सुट्यानंतर पुन्हा शालेय मार्गावर धावत असल्याचे चित्र आहे़ मानव विकास मिशनअंतर्गत जिल्ह्यात निळ्या रंगाच्या एकूण ४५ बसेस आल्या होत्या़ त्या सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात होत्या़ उन्हाळी सुट्यांमध्ये सदरील बसेस लांब पल्ल्याच्या गावांना तसेच प्रासंगिक करारासाठी चालविण्यात येत होत्या़ त्यापासून एसटी प्रशासनाला चांगले उत्पन्नही मिळाले़ परंतु १६ जून रोजी शाळा सुरु झाल्या असून मानव विकास अंतर्गतच्या सर्व बस नियमित व वेळेवर आगारातून मार्गस्थ करण्याच्या व ठरवून दिलेल्या मार्गावरच पाठवाव्यात, अशा सूचना विभाग नियंत्रक बाळासाहेब घुले यांनी आगारप्रमुखांना दिल्या आहेत़ त्यानुसार बसेस शालेय फेऱ्याकरिता वापरण्यात येणार आहेत़ मानव विकास मिशन अंतर्गतच्या जिल्ह्यात एकूण ४५ बसेस आहेत़ त्यामध्ये भोकर आगारास १० बसेस, नांदेड आगारास - ५ , किनवट - ५, देगलूर - ५, बिलोली - १०, कंधार- ५ तर हदगाव आगारास ५ बसेस उपलब्ध आहेत, अशी माहिती विभागीय सहाय्यक वाहतूक अधीक्षक एऩ एम़ चतुर्भुज यांनी दिली़ अनेक तालुक्यांना सदरील बस नसल्याने मुला-मुलींना गर्दीतून प्रवास करावा लागतो़ काही गावांमध्ये कोणतीही बस नसल्याने मुलींना अनेक किलोमीटरची पायपीट करीत शाळा गाठावी लागते़ विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एसटी महामंडळाने बस सुरू कराव्यात, मानव विकासच्या बस वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़ याकडेही एसटी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)मानव विकासअंतर्गतच्या बसेस इतर मार्गावर पाठविल्यास आगारप्रमुखांवर होणार कारवाई मानव विकास शालेय फेऱ्या नियमित व वेळेवर न गेल्यास आगारप्रमुखांनाच जबाबदार धरून कार्यवाही होणार ज्या ठिकाणी बसेस जात नाहीत अशा दुर्गम ग्रामीण भागात बसेस सोडण्याची विद्यार्थ्यांची मागणी