शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूक करताना रहा सतर्क, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७४५ पतसंस्था; आतापर्यंत ९ गुन्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 17:55 IST

गुंतवणूक करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात तब्बल ७४५ पतसंस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये हजारो नागरिकांनी आपल्या ठेवी विश्वासाने ठेवलेल्या आहेत. मात्र, असे असतानाही गैरव्यवहारामुळे काही पतसंस्था डबघाईला आल्या असून, अशा ९ पतसंस्थांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील पतसंस्थांची संख्या :१) नागरी पतसंस्था - ३०२२) ग्रामीण पतसंस्था - १०१३) नोकरदारांच्या पतसंस्था - ३३०४) प्राथमिक सहकारी नागरी बँका - १२

गुन्हे दाखल होण्याची प्रमुख कारणे :१) ठेवीदारांची फसवणूक करणे२) निधी परस्पर वळवणे३) बेकायदेशीर व्यवहार करणे

पतसंस्थांचे व्याजदर जास्तपतसंस्थांमध्ये बचत खात्यावर ५ ते ७ टक्के, तर मुदत ठेवींवर ८ ते १० टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जातात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत हे दर २ ते ३ टक्क्यांनी अधिक आहेत. त्यामुळे अनेक खातेदार पतसंस्थांकडे आकर्षित होतात. बहुतांश पतसंस्था आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असल्या, तरी काही मोजक्या संस्थांतील गैरव्यवहारांमुळे सर्व पतसंस्थांकडे बघण्याची दृष्टी बदलते.

पतसंस्थेचा इतिहास तपासणे आवश्यकपतसंस्था आर्थिक पाठबळ देण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, गुंतवणूकदारांनी संस्थेचा इतिहास तपासूनच गुंतवणूक करावी. संस्थेचा आर्थिक अहवाल, एनपीए (थकबाकी) प्रमाण, वार्षिक सभांचे विवरण आणि वसुलीची स्थिती पाहणे अत्यावश्यक आहे. केवळ जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये.मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर