शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या ४५ हजार कोटींच्या पॅकेजची अंमलबजावणी किती? मंत्रिमंडळ बैठकीचे संकेत

By विकास राऊत | Updated: August 31, 2024 19:27 IST

निधी, अध्यादेश आणि सत्य परिस्थितीची जुळवाजुळव विभागीय प्रशासनाने सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली होती. त्यात मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींसह १४ हजार कोटींचे सिचंनासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजची रक्कम कागदावरच असून, आजवर किती टक्के अंमलबजावणी झाली आहे, याची माहिती संकलित केली जात आहे.

निधी, अध्यादेश आणि सत्य परिस्थितीची जुळवाजुळव विभागीय प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान यावर्षीही बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होकार दिल्याचा दावा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केल्यामुळे विभागीय प्रशासन आठही जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या पॅकेजमधून काय हाती लागले, याचा डेटा संकलित करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी बैठक होईल, असा दावा केल्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

बैठकीला मुख्यमंत्र्यांचा होकारमुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने औपचारिक बैठक झाली. सरकार पुढील बैठकीच्या तयारीला लागले आहे. मंत्रिमंडळ बैठक दरवर्षी होते. यावर्षीदेखील होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. येणाऱ्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होतील. घोषणा व अंमलबजावणीचा प्राथमिक अहवाल पालकमंत्री सत्तार यांना सादर केला. त्यानुसार मुंबईत गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. १७ सप्टेंबर ध्वजारोहण आणि मंत्रिमंडळ बैठकीला येण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी होकार दिला आहे.- अब्दुल सत्तार, पालकमंत्री

जिल्हानिहाय घोषणा अशा :

छत्रपती संभाजीनगर : २ हजार कोटीधाराशिव : १ हजार ७१९ कोटीबीड : १ हजार १३३ कोटीलातूर : २९१ कोटीहिंगोली : ४२१ कोटीपरभणी : ७०३ कोटीजालना : १५९ कोटीनांदेड : ६६० कोटीएकूण : ७ हजार ८६ कोटी

कोणत्या विभागासाठी काय केल्या घोषणा?जलसंपदा - २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपयेसार्वजनिक बांधकाम - १२ हजार ९३८ कोटी ८५ लाखपशुसंवर्धन - ३ हजार ३१८ कोटी ५४ लाखनियोजन - १ हजार ६०८ कोटी २८ लाखपरिवहन - १ हजार १२८ कोटी ६९ लाखग्रामविकास - १ हजार २९१ कोटी ४४ लाखकृषी विभाग - ७०९ कोटी ४९ लाखक्रीडा विभाग - ६९६ कोटी ३८ लाखगृह - ६८४ कोटी ४५ लाखवैद्यकीय शिक्षण - ४९८ कोटी ६ लाखमहिला व बालविकास - ३८६ कोटी ८८ लाखशालेय शिक्षण - ४९० कोटी ७८ लाखसार्वजनिक आरोग्य - ३५.३७ कोटीसामान्य प्रशासन- २८७ कोटीनगर विकास- २८१ कोटी ७१ लाखसांस्कृतिक कार्य- २५३ कोटी ७० लाखपर्यटन - ९५ कोटी २५ लाखमदत व पुनर्वसन - ८८ कोटी ७२ लाखवन विभाग - ६५ कोटी ४२ लाखमहसूल विभाग- ६३ कोटी ६८ लाखउद्योग विभाग- ३८ कोटीवस्त्रोद्योग -२५ कोटीकौशल्य विकास-१० कोटीविधी व न्याय- ३ कोटी ८५ लाख१४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाChief Ministerमुख्यमंत्री