शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

बेघर कुटुंबांना घरांची प्रतीक्षा

By admin | Updated: September 5, 2016 00:59 IST

हणमंत गायकवाड , लातूर महानगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेसाठी समाजकल्याणच्या निकषानुसार सर्व्हे करून ३६४ बेघर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली असून,

हणमंत गायकवाड , लातूरमहानगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेसाठी समाजकल्याणच्या निकषानुसार सर्व्हे करून ३६४ बेघर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली असून, सहाय्यक आयुक्तांकडे ही यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मात्र निधी उपलब्ध नसल्याने मंजुरी रखडली आहे. चढत्या क्रमांकाने लाभार्थ्यांची निवड यादी करण्यात आली असून, मनपाचा पाठपुरावा नसल्याने ३६४ बेघर कुटुंबांंना सध्या तरी घराची प्रतीक्षा करावी लागत आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील व्यक्ती, कुटुंबांसाठी रमाई आवास घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत २०१०-११ पासून नागरी क्षेत्रातील लाभार्थ्यांचीही निवड केली जाते. लातूर महानगरपालिकेत २०१०-११ मध्ये ३०३ कुटुंबांना या योजनेत घरे मंजूर झाली. त्यापैकी २७५ घरांचे काम पूर्ण झाले असून, ३१ घरांची कामे सुरू आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर २०१५ रोजी लातूर महानगरपालिकेने समाजकल्याणच्या निकषानुसार लातूर शहरात सर्व्हे करून ३६४ लाभार्थ्यांची यादी या योजनेसाठी समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांकडे पाठविली. मात्र निधी असताना हा प्रस्ताव पाठविला गेला नाही. त्यामुळे मंजुरी प्रक्रियेत हा प्रस्ताव अडकला आहे. ज्यांना जागा आहे परंतु, घर नाही अशा व्यक्तींचाच हा प्रस्ताव आहे. प्रस्ताव पाठवून वर्षपूर्ती होत असली, तरी अद्याप मंजुरी नाही. त्यासाठी मनपानेही पाठपुरावा केला नाही. परिणामी, या लाभार्थ्यांचे मनपा कार्यालयात खेटे सुरू आहेत. पुण्याचा निधी लातूरला वर्ग होणार... घरकुलाचा पुणे जिल्ह्याचा अखर्चित निधी लातूरसाठी वर्ग होणार आहे. त्यातून ३६४ घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी ७ कोटी २८ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. समाजकल्याणच्या आयुक्तांनी हा निधी वर्ग करण्यासंदर्भात २० जानेवारी २०१६ रोजी आदेश दिले.मनपाचा पाठपुरावा नाहीसमाजकल्याणकडे निधी आहे. परंतु, मनपाने पाठपुरावा केला नसल्यामुळे लाभार्थ्यांना घरांची प्रतीक्षा आहे. मागासवर्गीय योजनांकडे मनपाचे नेहमीच दुर्लक्ष असते, असा आरोप नगरसेवक चंद्रकांत चिकटे यांनी केला.