शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 12:58 PM

Honor killing in Aurangabad? ही सर्व घटना संशयास्पद असून, तरुणीची आत्महत्या की घातपात हा प्रकार तपासानंतरच समोर येणार आहे.

ठळक मुद्देअठरा वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यूकुटुंबियांनी दौलताबाद पोलिसाकडून चौकशी सुरू

दौलताबाद ( औरंगाबाद ) : येथून काही अंतरावर असलेल्या टाकळीवाडीत (ता. गंगापूर) अठरा वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे बुधवारी समोर आले आहे. विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सांगितले जात असले, तरी तरूणीच्या वडिलांनी तिला खड्डा खोदून कुणालाही काही न सांगता पुरल्याने ही आत्महत्या की घातपात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलीस तपास करत आहेत. राधा कैलास जारवाल (१८) असे मयत तरूणीचे नाव आहे. ( Honor killing in Aurangabad? The father himself dug a pit and buried the body of the girl) 

प्राप्त माहितीनुसार मयत राधा जारवाल हिने सोमवारी (दि.२०) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आईशी घरगुती कारणावरून वाद घातला. सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वडील कैलास जारवाल घरी आले असता, राधाच्या आईने वडिलांकडे तिची तक्रार केली. तेव्हा वडिलांनी राधाला सरपणातील काठीने मारहाण केली. त्याचा राग अनावर झाल्याने राधाने घरातून पळ काढत शेताच्या दिशेने धाव घेतली व काही समजण्याआधीच विहिरीत उडी मारली. दरम्यान, वडील कैलास जारवाल हे पाठीमागून धावत गेले, तेव्हा मुलीने विहिरीत उडी मारल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा -जायकवाडी धरण @ ७५ % ; नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडीसाठी पुन्हा मोठा विसर्ग

वडिलांनी शेजारी राहणारे धनसिंग जारवाल (मोठे काका), रामसिंग जनगले (चुलत मामा) यांच्या मदतीने मुलीला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर घराजवळील गोठ्यातील खाटेवर ठेवले. सकाळी अंत्यविधी करू, असे तिघांनी ठरवले आणि तिघेही घराकडे निघून गेले. परंतु, घडलेला हा प्रकार वडिलांनी कोणालाही न सांगता रात्री एकट्यानेच मुलीला उचलून स्वत:च्या शेतातील विहिरीलगत खड्डा खोदून पुरून टाकले. दरम्यान, मंगळवारी या घटनेची कुणकूण नातेवाईक व गावकऱ्यांना लागली. पोलीस पाटील उदयसिंग जारवाल यांनी कुटुंबीयांची चौकशी केली. पण कोणीही काही सांगण्यास तयार नव्हते. अखेर बुधवारी दुपारी पोलीस पाटील यांनी दौलताबाद पोलिसांना याची माहिती दिली.

हेही वाचा - शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली

रात्री उशिरापर्यंत सुरू होती चौकशीया घटनेची माहिती मिळताच दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक रवी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. राठोड, पोलीस अंमलदार सुदर्शन राजपूत, व्ही. एस. खंडागळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. ही सर्व घटना संशयास्पद असून, तरुणीची आत्महत्या की घातपात हा प्रकार तपासानंतरच समोर येणार आहे. बुधवारी रात्री उशीर झाल्याने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता. रात्री उशिरापर्यंत दौलताबाद पोलीस ठाण्यात वडील कैलास जारवाल व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू होती.

हेही वाचा - गौरवास्पद ! नांदेडचे भूमिपुत्र विवेक चौधरी यांची वायुसेना प्रमुख पदावर वर्णी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद