गृहउद्योग : दोन हजार महिलांची फसवणूक
By Admin | Updated: December 18, 2015 00:18 IST2015-12-18T00:04:17+5:302015-12-18T00:18:06+5:30
औरंगाबाद : कापडी पिशव्या शिवण्याचे काम करा आणि घरच्या घरीच रोजगार मिळवा, अशा प्रकारचे आमिष दाखवून शहरातील सुमारे दोन हजार बेरोजगार महिलांना एकाने सुमारे दहा लाखांना गंडा घातला.

गृहउद्योग : दोन हजार महिलांची फसवणूक
औरंगाबाद : कापडी पिशव्या शिवण्याचे काम करा आणि घरच्या घरीच रोजगार मिळवा, अशा प्रकारचे आमिष दाखवून शहरातील सुमारे दोन हजार बेरोजगार महिलांना एकाने सुमारे दहा लाखांना गंडा घातला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर श्रीराम केंद्रे (रा. जैननगर, नागपूर) असे आरोपीचे नाव असून, तो फरार झाला आहे. केंद्रे याने चिकलठाणा येथील चौधरी कॉलनी येथे साई कृपा सर्व्हिसेस अँड मार्केटिंग नावाची बोगस संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फ त बेरोजगारांना घरच्या घरी काम देण्याचे आमिष त्याने दाखविले. त्यासाठी त्याने दहा ते पंधरा महिलांचे ग्रुप तयार करण्यास सांगितले. प्रतिदिन ५०० रुपये डिपॉझिट देणाऱ्या महिलेस प्रतिदिन ५० पिशव्या तयार करण्याचे काम मिळेल. त्याने प्रत्येक टीम लीडरकडून सुमारे आठ ते दहा हजार रुपये जमा केले. ही रक्कम जमा केल्यानंतर तो हैदराबादहून कच्चामाल घेऊन येतो, असे सांगून गायब झाला.