अज्ञात वाहनाच्या धडकेत पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 16:09 IST2019-03-01T16:08:51+5:302019-03-01T16:09:13+5:30
यात सोन्नार यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी
दावरवाड़ी (औरंगाबाद ) : पैठणला दुचाकीवर जाणाऱ्या पतीपत्नीच्या गाडीला पाचोड़ राज्य महामार्गावर दावरवाडी येथे अपघात झाला. यात दुचाकीस्वार बाबासाहेब आसाराम सोन्नार वय (२८, विहामांड़वा ता पैठण ) जागीच ठार झाले असून त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. ही घटना दावरवाड़ी शिवारात गुरुवारी रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान नानेगाव फाट्याजवळ घड़ली.
गुरुवारी रात्री बाबासाहेब आसाराम सोन्नार हे आपल्या पत्नीसह पाचोडवरून पैठणला दुचाकीने (एम एच २० ड़ीझेड़ ८३६१) जात होते. नानेगाव फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सोन्नार यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी सिमा (२५) या गंभीर जखमी झाल्या.
बाबासाहेब सोन्नार यांच्या पश्चात आई वड़ील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. विहामांड़वा येथे शोकाकुळ वातावरणात त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सपोनि अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहीते व सहकरी करत आहेत.