जमीनीच्या व्यवहारातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 23:13 IST2019-03-17T23:12:55+5:302019-03-17T23:13:11+5:30

औरंगाबाद : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पिता-पुत्राला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ही ...

 Hit the ground deal | जमीनीच्या व्यवहारातून मारहाण

जमीनीच्या व्यवहारातून मारहाण

औरंगाबाद : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून पिता-पुत्राला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना १६ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सिडको एन-७ येथे घडली.


सुरेश सखाराम सिनगारे (रा. गारखेडा परिसर) आणि भूषण शिरोळे (रा. सिडको एन-५), अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. सिडको एन-७ येथील अनिल नारायण कुलकर्णी आणि सुरेश सिनगारे यांचा जमीन विक्रीचा व्यवहार आहे. १६ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुलकर्णी हे त्यांच्या घरी असताना आरोपी तेथे आले. आम्हाला तुमची जमीन नको, आमचे पैसे परत करा, असे म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अजिंक्यलाही धक्काबुक्की केल्याचे कुलकर्णी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले.

Web Title:  Hit the ground deal