शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून साडेबारा लाख लुटले

By admin | Updated: August 29, 2016 00:52 IST

औरंगाबाद : परभणी येथून मुंबईला जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याचे जालना रेल्वेस्टेशन येथून अपहरण करून त्याच्याकडील १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि टपालाची ७० पाकिटे लुटण्यात आली.

औरंगाबाद : परभणी येथून मुंबईला जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्याचे जालना रेल्वेस्टेशन येथून अपहरण करून त्याच्याकडील १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि टपालाची ७० पाकिटे लुटण्यात आली. लुटमार करणाऱ्या तोतया पोलिसांनी अपहरणकर्त्याला औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीलगत आणून सोडले. ही घटना २६ आॅगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परभणी येथील साबू कुरिअरचे कर्मचारी अनिल भुजंगराव वाघमारे (३७, रा. धनेगाव, जि. नांदेड) हे २६ आॅगस्ट रोजी टपालाची ७० पाकिटे आणि रोख १२ लाख ५० हजार रुपये घेऊन रेल्वेने मुंबईला जात होते. रात्री ९.४० वाजेच्या सुमारास देवगिरी एक्स्प्रेस जालना रेल्वेस्टेशनवर आल्यानंतर पाच जण वाघमारे यांच्याजवळ आले. आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे आयकार्ड दाखविले. त्यांनी त्यास बॅगसह रेल्वेतून खाली उतरविले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात चल म्हणून स्थानकाबाहेर काढून एका जीपमध्ये (क्रमांक एमएच-२० सीओ ६०६८) बसविले. प्रथम त्यांनी वाघमारे यांचा मोबाईल आणि रोख रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी चालत्या गाडीत बॅगेतील सर्व पाकिटे फोडून पाहण्यास सुरुवात केली. विमाततळाच्या भिंती लगत वाघमारे यांना सोडून सर्व आरोपी पसार झाले. (प्रतिनिधी)ही घटना जालना रेल्वेस्थानकावर घडली आहे. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असेल, असा कुरिअर मालकाचा अंदाज होता. त्यामुळे त्याससोबत घेऊन ते जालना स्टेशन येथे गेले. तेव्हा तेथे सीसीटीव्ही नसल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी मात्र वाघमारे यांच्याकडेच या घटनेची चौकशी सुरू केली आहे.