शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:08 IST

महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा न्या. एस. पी. देशमुख व न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या वेळी केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नहर- ए- अंबरीच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेने काय उपाय केले, याबाबत खंडपीठाने नोटीस बजावूनही औरंगाबाद महापालिकेने मुदतीत उत्तर दाखल केले नाही. महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा न्या. एस. पी. देशमुख व न्या. संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या वेळी केली. महापालिकेने उत्तर दाखल करण्यासाठी पुन्हा वेळ देण्याची विनंती केली असता खंडपीठाने या ‘जनहित याचिकेची’ पुढील सुनावणी २७ सप्टेंबर २०१७ रोजी ठेवली आहे.नहर-ए-अंबरीच्या संवर्धनासंदर्भात अ‍ॅड. रूपा दक्षिणी यांनी औरंगाबाद खंडपीठात ‘जनहित याचिका’ दाखल केली आहे. या याचिकेवर ७ मार्च २०१७ रोजी प्राथमिक सुनावणी झाली असता खंडपीठाने महानगरपालिकेस नोटीस बजावून नहर-ए-अंबरीच्या सवंर्धनासाठी काय उपाययोजना केली, याबाबत विचारणा केलीहोती.महानगरपालिकेस खंडपीठाची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही मुदतीच्या आत उत्तर दाखल केले नाही.मंगळवारी या जनहित याचिकेवर सुनावणी झाली असता ही बाब खंडपीठाच्या निदर्शनास आली. महानगरपालिकेने वेळेत उत्तर दाखल केले नसल्यामुळे महापालिकेला अवमानाची नोटीस का बजावण्यात येऊ नये, अशी विचारणा त्यावर करण्यात आली. महानगर पालिकेच्या वतीने अ‍ॅड. अंजली दुबे - वाजपेई यांनी उत्तर दाखल करण्यासाठी पुन्हा वेळ देण्याची विनंती खंडपीठास केली. खंडपीठाने ही विनंती ग्राह्य धरून या जनहित याचिकेवर पुढील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.