शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 11:38 IST

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब विरोधक आणि त्यांच्या सभेत गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर जाम भडकले आहेत...

संपूर्ण राज्यात सुरूअसलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पारा जबरदस्त वाढताना दिस आहे. नेते मंडळींचे आरोप प्रत्यारोप अधिकाधिक धारदार होताना दिसत आहे. यातच आता गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब विरोधक आणि त्यांच्या सभेत गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर जाम भडकले आहेत. एढेच नाही, तर त्यांनी यावेळी, आपले प्रतिस्पर्धक तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मराठवाड्याचे पदवीधर आमदार सतिश चव्हाण यांना थेट आव्हानही देऊन टाकले. बंब गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे बोलत होते.  

काय म्हणाले प्रशांत बंब...? -सभेत गोंधळ निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना बंब म्हणाले, "अरे माझ्या सभेत चार-पाच गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो मी गावात जाऊ लागलो, हेच भाषण करू लागलो, हेच सांगू लागलो. मुद्दाम, काय करतात? पाच मिनिटे झाली की चार पाच मुले उठतात आणि मला विचारतात तुम्ही हे-हे-हे का नाही केलं? मी त्यांना ऐकून घेतो आणि सांगतो की, बेटा मी हे केले आहे. हे बघ हा पुरावा. मग लोक सांगतात, हो यांनी केलेलं आहे. सांगितल्या प्रमाणे. जितके सांगितले त्यापेक्षा जास्त केले." 

पण मुद्दा हा आहे की... -पुढे बोलताना बंब म्हणाले, "यानंतर, दुसरंच काही तरी विचारतात. अर्धा तास मुद्दा माझ्या प्रश्नांशी जे संबंधित नाही, असं विचारतात. तरी मी त्यांना सांगतो. पण मुद्दा हा आहे की, माझी डेव्हलपमेंट लोकंपर्यंत पोहोचूच नये, मला बोलू देत नाहीत मुद्दाम, असे शडयंत्र रचून मला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना सांगू इथे माझी जनता, माझ्या ताई लोक एवढे खुळे नाहीत. त्यांना सर्व समजतं."

आमदार सतिश चव्हाण यांना थेट आव्हान -बंब म्हणाले, "माझ्या समोर जे उभे आहेत त्यांना माझे जाहीर आव्हान आहे, त्यांनी 17 वर्षात काय केले त्याचा लेखा जोखा द्यावा. माझी त्यांना आणि मीडियाला विनंती आहे की, तुम्ही सगळे मीडिया वाले माझी आणि त्यांची समोरासमोर बसवून आमच्या दोघांचे कामे विचारात. समोरासमोर बसवा, तयार आहे मी. येणारच नाही येथे, चॅलेंज आहे. सगळ्या मीडिया वाल्यांनी त्यांना विनंती करायची आहे की, तुम्ही पदवीधर आमदार आहात आणि हा 15 वर्षापासून आमदार आहे. मग एक काम करा, समोरासमोर बसा. तुम्ही तुमची कामे सांगा, मी माझी कामे सांगतो. जर माझ्या 10 टक्के कामे जरी त्यांनी केली असतील, तर मी  राजीनामा देऊन त्याचा कार्यकर्ता बनून जाईल. आणखी आता काय बोलू? संपूर्ण राज्याच्या समोर बोलतोय." 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Prashant Bambप्रशांत बंबBJPभाजपाSatish Chavanसतीश चव्हाणbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४