शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत’

By admin | Updated: August 18, 2014 00:57 IST

जालना : धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत मिळत असून, ही भांडवलशाही धर्माच्या नावावर राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे,

जालना : धर्माच्या नावावर चालणाऱ्या चळवळीला भांडवलदारांची मदत मिळत असून, ही भांडवलशाही धर्माच्या नावावर राज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते व विश्लेषक डॉ.भालचंद्र कांगो यांनी येथे केले.जालना येथील लोकमंगल प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘जागतिकीकरणात कामगार चळवळीचे भवितव्य’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून कामगार नेते अण्णा सावंत यांची उपस्थिती होती. तसेच प्रसिध्द लेखक विचारवंत डॉ.प्रल्हाद लुलेकर, प्रा.श्याम मुंडे आदींची वक्ते म्हणून उपस्थिती होती.यावेळी बोलतांना डॉ.कांगो म्हणाले की, धर्मांध शक्तीला रोख शकणारी एकही शक्ती आज नाही, जाती धर्माच्या नावाने रोज नवीन संघटना वाढत आहे.जाती धर्माला पाठिंबा देवून पिळवणुकीवर आधारीत समाजरचना निर्माण होत आहे. कामगार चळवळीला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र भांडवलदारांकडून रचले जात आहे. मात्र, कामगार चळवळ ही पृथ्वीच्या अंतापर्यंत जीवंत राहील, यात शंका नाही. भारतीय समाज रचनेत संघटीत व असंघटीत कामगार मोठ्या प्रमाणात असले तरी जाती व धर्मात ते विखुरले गेले आहेत. भांडवलशाही समाजात विषमता निर्माण करून देशातील कष्टकरी व कामगारांना नागडे करण्याच्या प्रयत्नात आहेत. भांडवलशाहीचा हा डाव कष्टकरी व कामगारांनी संघटीत होऊन उधळून लावावा, असे आवाहनही डॉ.कांगो यांनी केले.यावेळी बोलतांना डॉ.प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, मध्यमवर्गीयामुळे समस्त चळवळीला धोका निर्माण झाला आहे. हा मध्यमवर्गीय समाज कुठलीही भूमिका घेत नाही. त्यांच्याकडून नितीपालनाचे कार्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य व उपेक्षित समाज संघटीत होत नाही. जागतिकीकरणात मानवी मुलभूत सुविधा उपलब्ध न करता उलट तीर्थक्षेत्राच्या विकासावर उधळपट्टी केली जात आहे. मानवी विकासाकडे लक्ष दिले जाईल, अशी परिस्थिती आज तरी दिसत नसल्याचे डॉ.लुलेकर म्हणाले.यावेळी बोलतांना डॉ.श्याम मुडे म्हणाले की, कष्टकरी व कामगारवर्ग या भांडवलाहीत बेदखल झाला आहे. आज या कष्टकरी व कामगारांना बेदखल समाज म्हणून बघितले जात आहे. या समाजाचे प्रश्न जागतिकीकरणामुळे अत्यंत बिकट झाले असून, या समाजाला संघटीत करून त्यांची दखल घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.अध्यक्षीय समारोप करतांना कामगार नेते अण्णा सावंत म्हणाले की, जागतिकीरणात कामगार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी संघटन आवश्यक असून, भांडवलशाही विरूध्द एकसंघ होऊन लढा उभारण्याची आज गरज आहे. कष्टकरी व कामगारांना सोबत घेऊन सर्वांनी त्यांना विकासाच्या मार्गावर आणले पाहिजे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)