शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरले;कारनंतर केली महामार्गाची हवाई पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 12:40 IST

मागील महिन्यात मंत्री एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गावरून वर्ध्यापासून औरंगाबादपर्यंत हायस्पीड कारने आले होते. हवाई पाहणीनंतर एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरले

औरंगाबाद : पहिल्या टप्प्यात साधारणपणे मे महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. दरम्यान, मागील महिन्यात मंत्री शिंदे वर्ध्यापासून औरंगाबादपर्यंत कारने आले होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. मुंबईपासूनच ते समृद्धी महामार्गाच्या समांतर हवाई मार्गाने आले. त्यानंतर गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांच्यामध्ये समृद्धी महामार्गावर मंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर उतरवलं. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी महामार्गावर उतरून पाहणी केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडणारा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार आणि जालना ते शिर्डी पूर्णपणे तयार आहे.

प्राण्यांसाठी ‘वाईल्ड लाईफ ओव्हरपास’ व ‘अंडरपास’ औरंगाबाद जिल्ह्यातून १२० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग जात असून, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्यात आले आहेत, तर सावंगीच्या पूर्वेला पोखरीजवळ बोगदा उभारण्यात आला आहे. पुढे जटवाड्याजवळ डोंगर कापून हा रस्ता गेला आहे. दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी वन्यप्राण्यांना अडथळा येऊ नये, विनाव्यत्यय त्यांचा वावर व्हावा, यासाठी या महामार्गावर दोन ‘वाईल्ड लाईफ ओव्हरपास’ व दोन ‘अंडरपास’ तयार करण्यात आले आहेत. यापैकी दौलताबादच्या अलीकडे व जटवाड्याजवळ ‘वाईल्ड लाईफ ओव्हरपास’ तयार केला जात आहे, तर लासूरजवळ अंडरपास तयार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेऊन वन विभागाने सुचविलेल्या ठिकाणी हे ओव्हरपास व अंडरपास तयार केले जात आहेत. ओव्हरपास महामार्गावरून जाईल. हुबेहूब जंगलातील रस्त्यांची अनुभूती देणारे ओव्हरपास व अंडरपास तयार केले जात आहेत. ज्यामुळे वन्यप्राण्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुक्त संचार करता येईल, याची दक्षता घेतली जात आहे.

चार ठिकाणी पेट्रोल पंपाची सुविधाजिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांना इंधन भरण्यासाठी चार ठिकाणी सुविधा देण्यात आली आहे. याठिकाणी थेट भारतीय तेल कंपन्या पेट्रोल पंप चालविणार आहेत. पंपांचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, महिनाभरात पूर्ण क्षमतेने हे पंप कार्यान्वित होतील.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबाद