मराठवाड्यातील २६ मंडळात जोरदार बरसला; ११८ मि.मी. जास्त पावसामुळे ओलांडली सरासरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:32 IST2024-09-27T12:32:10+5:302024-09-27T12:32:22+5:30
मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून ७९७ मि.मी. पाऊस झाला आहे.

मराठवाड्यातील २६ मंडळात जोरदार बरसला; ११८ मि.मी. जास्त पावसामुळे ओलांडली सरासरी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील २६ मंडळात बुधवारी रात्रीतून जाेरदार पाऊस झाला. ६५ मि.मी.च्या पुढे पाऊस गेल्यामुळे अतिवृष्टीची नाेंद हवामान खात्याने घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७, जालन्यातील ३ , बीडमधील १, नांदेड जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाबतारा मंडळात ११० मि.मी. पाऊस झाला. ११८ मि.मी. जास्तीचा पाऊस झाल्याचे आकडे सांगत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन मंडळात वेगाने पाऊस झाला. मराठवाड्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असून विभागात ११७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात ६५ मि.मी.,भावसिंगपुरा मंडळात ७१, लाडसावंगी ८९, हर्सूल ७८, चौका मंडळात ६७ मि.मी. पाऊस झाला. पैठण तालुक्यातील बालानगर मंडळात ६५, गंगापूर तालुक्यातील मांजरी मंडळात ६९, शेंदूरवादा ६७, वैजापूर शहरात ९७ मि.मी, महालगाव ८३, नागमठाण ७४, लाडगाव ९७, घायगाव ९७, बाबतारा ११० मि.मी. पाऊस झाला. सिल्लाेड तालुक्यातील अंभई मंडळात ६७, सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडळात ८०, फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा मंडळात ७७ मि.मी. पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा मंडळात ६८ मि.मी, जाफ्राबाद शहरात ६८, टेंभुर्णी ६८, वागरूळ ७०, मंठा तालुक्यातील ढोकसळ मंडळात ९३ मि.मी, बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरात ७२ मि.मी. तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील चांदोळा मंडळात ८३ मि.मी व मुखेड शहरात ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली. मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून ७९७ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्हानिहाय झालेला पाऊस
जिल्हा...........२६ सप्टेंबरचा पाऊस.........एकूण टक्केवारी
छत्रपती संभाजीनगर.....४५ मि.मी..........१२९ टक्के
जालना......२४ मि.मी......................१३२ टक्के
बीड....१३ मि.मी.......................१३५ टक्के
लातूर....७ मि.मी. ......................१११ टक्के
धाराशिव....८ मि.मी. ...............१२० टक्के
नांदेड....१३ मि.मी. ................१०६ टक्के
परभणी....८ मि.मी....................१०७ टक्के
हिंगोली....७ मि.मी...................११० टक्के
एकूण....१८ मि.मी. ................११७ टक्के