शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

औरंगाबादेत कचऱ्याच्या धुराने दम्याच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 5:16 PM

शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.

ठळक मुद्दे: अनुवंशिकता, वायू प्रदूषण, अ‍ॅलजी, ताणतणावसह अन्य कारणांनी १०० व्यक्तींमागे १० लोकांमध्ये दमा आढळतो.. दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे.

औरंगाबाद : अनुवंशिकता, वायू प्रदूषण, अ‍ॅलजी, ताणतणावसह अन्य कारणांनी १०० व्यक्तींमागे १० लोकांमध्ये दमा आढळतो. दम्याचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले.

दम्याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन साजरा करण्यात येतो. यंदा १ मे रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. ‘प्रत्येक श्वासाबरोबर दम्याला दूर करूया,’ असे यंदाचे घोषवाक्य आहे. दमा (अस्थमा) हा श्वसननलिकेचा आजार आहे. हा आजार सहा महिन्यांच्या बालकापासून ते ६० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांमध्येही आढळतो. जास्त काळ खोकला येणे, छातीत खफ होणे, श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे ही काही लक्षणे आहेत. थंड हवामान, वायू प्रदूषण, धूम्रपान अथवा धूम्रपान करणाऱ्यांच्या सान्निध्यात येणे, धूळ, धुराची अ‍ॅलर्जी, अनुवंशिकता, लठ्ठपणा अशी काही दमा होण्याची कारणे आहेत. या आजाराविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

रुग्णालयात वाढली गर्दीशहरात गेले काही दिवस प्रत्येक भागामध्ये दिवस-रात्र कचरा जाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे प्रदूषणात तर भर पडली; परंतु सोबतच दम्याच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली. कचराकोंडीपूर्वी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या आणि     कचराक ोंडीनंतरची संख्या पाहता त्यात दीडपटीने वाढ झाल्याचे दमा विकारतज्ज्ञांनी सांगितले.

कचऱ्याचा परिणामविविध कारणांसह कायम वायू प्रदूषणाच्या वातावरणात राहिल्याने दमा होतो. कचरा जाळण्यामुळे गेले काही दिवस दम्याच्या रुग्णांत दीडपटीने वाढ झाली. आजारासंदर्भात वेळीच खबरदारी घेणे आवश्यक ठरते.- डॉ. सुहास बर्दापूरकर

जनजागृतीची गरजदम्याच्या आजाराविषयी अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. हा आजार होऊ नये, यासाठी लहान मुलांचे वेळच्या वेळी लसीकरण करणे, धूम्रपान न करणे, रात्री जागरण न करणे यासह अनेक प्रतिबंधात्मक उपाय करता येतात.- डॉ. बालाजी बिरादार

टॅग्स :Healthआरोग्यGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका