मनपातील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:52 IST2019-05-21T23:50:30+5:302019-05-21T23:52:11+5:30
महापालिकेतील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. वर्षभराच्या कामाचे नियोजन सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. ‘केआरए’मुळे सर्वांच्या कामाची दिशा एकच राहते आणि कामासाठी घेतलेले परिश्रम वाया जात नाहीत, असे आयुक्तांनी सांगितले.

मनपातील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’
औरंगाबाद : महापालिकेतील विभाग प्रमुखांना आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू करण्यात आला आहे. वर्षभराच्या कामाचे नियोजन सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी विभाग प्रमुखांना दिले आहे. ‘केआरए’मुळे सर्वांच्या कामाची दिशा एकच राहते आणि कामासाठी घेतलेले परिश्रम वाया जात नाहीत, असे आयुक्तांनी सांगितले.
डॉ. निपुण विनायक यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या नावाने पत्र काढले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपण आपल्या विभागाचे काम करताना काही ठराविक निकष समोर ठेवल्यास कामाला एक दिशा मिळते आणि केलेल्या कामाचा फायदा होतो. आपल्या विभागाशी संबंधित असे निकष काय असावेत याबाबत वेळोवेळी चर्चा केली आहे. त्याचे संकलन केलेली यादी या पत्रासोबत दिली आहे. पुढील एक वर्षात कामे करताना ‘केआरए’ हे मार्गदर्शक समजून आपण काम करावे. ‘केआरए’ साध्य करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत, ‘केआरए’ आपल्या कार्यमूल्यांकनासाठीदेखील उपयुक्त ठरेल.
आपण आपल्या कामाचे नियोजन ‘केआरए’प्रमाणे करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावा. कार्यवाहीचा प्रगती अहवाल दर शनिवारी सादर केल्यास मी आपला आभारी राहील. ‘केआरए’ आपण लॅमिनेट करून आपल्या टेबलवर किंवा कक्षात दर्शनी भागात लावल्यास उद्दिष्टपूर्तीसाठी तो उपयोगी ठरू शकेल.