शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

विभागप्रमुखांचे ‘करार’ मोडीत

By admin | Updated: August 25, 2014 00:23 IST

औरंगाबाद : विद्यापीठातील विभागांमध्ये सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमध्ये परस्पर विनापरवाना सामंजस्य करार करण्याची सुरू असलेली स्पर्धा मोडीत काढण्याचा फतवा ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’च्या संचालकांनी नुकताच जारी केला आहे. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. डॉ. काळे यांनी कामकाजाची पद्धत समजावून घेतली. तेव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, विद्यापीठातील अनेक शैक्षणिक विभागांमध्ये व्यवस्थापन परिषदेची पूर्वपरवानगी न घेताच काही उद्योग, स्वायत्त संस्था, खाजगी संस्थांसोबत सामंजस्य करार केले जातात. बहुतांशी विभागांत झालेले करार हे निव्वळ प्रासंगिक ठरलेले आहेत. विद्यापीठात होणाऱ्या सामंजस्य कराराबाबत एकवाक्यता असावी, या हेतूने ‘बीसीयूडी’च्या संचालकांनी एक परिपत्रकच काढले असून ते कुलसचिव, विद्यापीठाचे उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे संचालक व सर्व विभागांना जारी केले आहे. विद्यापीठ कायद्यान्वये विद्यापीठ, महाविद्यालये व राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिसंस्था, वैज्ञानिक, औद्योगिक, वाणिज्य संघटना यांच्यामध्ये सहयोग वृद्धिंगत करण्यासाठी तसेच त्याला चालना देण्यासाठी ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांनाच अधिकार असेल. कलम १७ (७) अन्वये विद्यापीठ प्राधिकरणाच्या निर्णयाच्या अधीन राहून कुलसचिव यांना विद्यापीठाच्या वतीने करार करण्याच्या दस्तावेजावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असेल. सामंजस्य करार करण्यासंदर्भात विद्यापीठात ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’चे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीे. समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचे २ सदस्य, दोन विभागांतील प्राध्यापक व विद्याशाखेचा अधिष्ठाता यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागाने समितीच्या शिफारशी व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेशिवाय परस्पर कसलाही सामंजस्य करार करू नये. विनापरवानगी करार केल्यानंतर एखादा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाची असेल.