मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून मित्राला गाडीखाली चिरडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 20:40 IST2018-03-23T20:19:09+5:302018-03-23T20:40:38+5:30

मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास  सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली.

he kills his friend due to talking with his girl friend | मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून मित्राला गाडीखाली चिरडले 

मैत्रिणीशी बोलण्याच्या वादातून मित्राला गाडीखाली चिरडले 

औरंगाबाद : मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर रागाच्या भरात मोपेडस्वार मित्राला चिरडून ठार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजेच्या सुमारास  सिडको एन-२ येथील जिजाऊ चौकात घडली. या घटनेत इतर दोन तरुण जखमी झाले.
संकेत संजय कुलकर्णी (२०,रा.पुणे, मूळ रा.पाथरी,जि.परभणी)असे मृत तरुणाचे नाव आहे. तर जखमींमध्ये शुभम संजय डंक(१७,रा. उस्मानपुरा, एम्पायर वसतिगृह) आणि विजय कडुबा वाघ(२०,रा.जयभवानीनगर गल्ली नंबर १) यांचा समावेश आहे. तर संकेत प्रल्हाद जायभाये (२२,रा. जयभवानीनगर, गल्ली नंबर ११)असे कारचालक आरोपीचे नाव आहे. 

अंगावर काटा आणणार्‍या या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, मृत संकेत कुलकर्णी,जखमी विजय, शुभम आणि आरोपी संकेत हे चांगले मित्र आहेत. मृत संकेत पूर्वी औरंगाबादेत राहत होता. तो त्याच्या मैत्रिणीसोबत सतत बोलत असतो. त्या मुलीवर आरोपी संकेतचे एकतर्फी प्रेम असून संकेतने तिच्याशी बोलू नये, असे आरोपीने त्याला अनेकदा सांगितले होते. त्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाला. याच दरम्यान संकेत  औरंगाबादेत मित्रांना भेटण्यासाठी आला. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संकेत आणि त्याचे मित्र हे एका मोपेडने एन-२ सिडक ोतील कामगार चौकाकडून महालक्ष्मीचौकाकडे जात होते. चौकाजवळ कार (एमएच-१६एजे १५८५) घेऊन आलेल्या आरोपी संकेत जायभाये  आणि संकेत कुलकर्णीमध्ये कुरबुर झाली. त्यानंतर  संकेत, शुभम आणि विजय हे मोपेडने ट्रिपलसीट पुढे निघाले. ते शंभर मिटर पुढे असताना आरोपीने वेगात येऊन मित्रांच्या मोपेडला  जोराची धडक दिली. यात तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यानंतर आरोपीने त्याची कार वळवून त्यांच्या दिशेने वेगात आणली. आरोपी कार घेऊन वेगात येत असल्याचे पाहून विजय आणि शुभम बाजुला पळाले, यावेळी आरोपीने त्याची कार  संकेतच्या अंगावर घातली यातच संकेतचा अंत झाला. यांनतर आरोपी फरार झाला असून मुकुंदवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Web Title: he kills his friend due to talking with his girl friend