शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये ठणठणाट

By admin | Updated: October 3, 2014 00:37 IST

औरंगाबाद : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महात्मा गांधी जयंती व दसरा आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग दोन सुट्या मिळणार आहेत.

औरंगाबाद : आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महात्मा गांधी जयंती व दसरा आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सलग दोन सुट्या मिळणार आहेत. सुट्या आणि सण आल्यामुळे शहरातील बँकांमध्ये बुधवारी दिवसभर गर्दी दिसून आली. दिवसभरात नियमित व्यवहारांपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचे बँकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु दसऱ्याच्या दिवशीच एटीएममध्ये ठणठणाट होण्याची शक्यता आहे.सलग सुट्यांमुळे अनेक शासकीय कर्मचारी शनिवारची रजा घेऊन रविवारच्या सुटीसह चार दिवसांच्या सुटीचा आनंद घेण्याचे नियोजन करीत होते. या नियोजनानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी बुधवारीच बँक व एटीएममधून पैसे काढले होते. यामुळे बँकांच्या व्यवहारात वाढ झाली.सलग सुट्या असल्यामुळे बँकांकडून एटीएममध्ये पैसे भरण्यात आले; परंतु सण असल्यामुळे शनिवारपर्यंत पुरतील का, असा प्रश्न उभा आहे. दसऱ्याच्या दिवशी अनेक जण नवीन वाहन, घर इतर वस्तू खरेदी करतात. यामुळे सणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. एक आॅक्टोबर रोजी बहुतांश शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार बँकांमध्ये जमा झाले आहेत. खात्यावर पैसे असल्यामुळे काढण्याचे प्रमाण अधिक असते.शनिवारी बँकांचेव्यवहार सुरूसलग सुट्या असल्या तरी बुधवारी सर्व एटीएममध्ये पैसे भरण्यात आले आहेत. त्यामुळे जास्त परिणाम होणार नाही. शनिवारी बँकांचे व्यवहार नियमितपणे सुरू राहतील, असे स्टेट बँक आॅफ हैदराबादचे प्रमोद बेंडे यांनी सांगितले.दसऱ्याच्या दिवशी अडचण होऊ शकतेग्राहकांची गुरुवारी अडचण झाली नाही; पण शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी अडचण होऊ शकते. शनिवारी पुन्हा व्यवहार नियमित होईल, अशी माहिती बँक आॅफ महाराष्ट्रचे देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.