शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पाडापाडीचे अर्धशतक

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या वतीने अतिरिक्त बांधकाम पाडापाडीची अतिक्रमण हटाव पथकाने अर्धशतकी कारवाई केली आहे.

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेच्या वतीने अतिरिक्त बांधकाम पाडापाडीची अतिक्रमण हटाव पथकाने अर्धशतकी कारवाई केली आहे. आज सातारा गट नं. ३ मध्ये अश्पाक पटेल यांच्या, तर गट नं. १३० मधील मांडे यांच्या इमारतीचा प्रत्येकी एक मजला पाडण्यात आला. अतिक्रमण हटाव पथकाने २ डिसेंबरपासून सातारा- देवळाई परिसरातील अतिरिक्त बांधकामांवर हातोडा चालविला असून, मंगळवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथकाच्या टीमने दत्त मंदिराजवळील जी प्लस तीन इमारतीच्या एका अतिरिक्त बांधकामाचे छत ब्रेकरने ठिसूळ केले. दुपारनंतर साताऱ्यातील गट नं. ३ मधील जी प्लस ४ च्या एका मजल्यावर हातोडा व ब्रेकरने घाव करण्यात आले. पथकाने निवासी वसाहतीवरील कारवाई थांबविली आहे; परंतु ३५० कामांना नोटिसा बजावल्या असून, चटई क्षेत्राच्या व्यतिरिक्त बांधकामाचा निकष लावून हातोड्याचा जोर कायम ठेवत ५० बांधकामे पाडली आहेत. मुख्यमंत्र्यांना साकडेघरावरील कारवाई रोखावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादेतून मुंबईला गेलेल्या एका बांधकाम व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे. मात्र, कारवाईचा हातोडा थांबलेला नसून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान सुरूच आहे. ही कारवाई शिथिल करून मालमत्ता कायम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वप्नील अकोलकर, दीपक जगदाळे, नशीर पटेल, भारत चौरे यांच्यासह अनेकांनी केली आहे.