पोलीस ठाण्यातून हायवा पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:24 IST2018-11-10T20:48:26+5:302018-11-10T21:24:30+5:30
वाळूज महानगर : वाळूची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने पकडलेला हायवा ट्रक वाळूमाफियाने चक्क वाळूज पोलीस ठाण्यातूनच पळविण्यात आल्याचे उघडकीस येत आहे. वाळूमाफियांशी असलेल्या लागेबांध्यामुळे हा हायवा पोलिसांच्या मदतीने लांबविल्याची चर्चा वाळूज परिसरात दबक्या आवाजात सुरु आहे.

पोलीस ठाण्यातून हायवा पळविला
वाळूज महानगर : वाळूची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने पकडलेला हायवा ट्रक वाळूमाफियाने चक्क वाळूज पोलीस ठाण्यातूनच पळविण्यात आल्याचे उघडकीस येत आहे. वाळूमाफियांशी असलेल्या लागेबांध्यामुळे हा हायवा पोलिसांच्या मदतीने लांबविल्याची चर्चा वाळूज परिसरात दबक्या आवाजात सुरु आहे.
वाळूज परिसरातील लांझी, धामोरी, शिवपुर, शेंदूरवादा, पैठण, टेंभापुरी आदी भागातून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक सुरु आहे. वाळू तस्करीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे अनेक कारवायांतून आढळून आले आहे. गंगापूरचे तहसीलदार डॉ.अरुण जºहाड, वाळूजचे तलाठी अशोक कळसकर, दीपक पांडे, जितेंद्र कळसकर, प्रशांत बनकर आदींच्या पथकाने ४ नोव्हेंबरला वाळूज परिसरात छापे मारले होते. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांसह जम्ीान मालक तसेच वाळू उत्खनन करणारे आदी २३ जणांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
याच कारवाईत महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळूसह हायवा ( एम.एच.२०-ई.जी. ६७१८) जप्त केला होता. जवळपास ५ ब्रॉस चोरीची वाळू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांनी चालक शेख एक्बाल (रा.जायकवाडी, ता.पैठण) व हायवा मालक दीपक वाघमोडे (रा.कांचनवाडी) यांच्याविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देत हा हायवा वाळूज पोलिसांच्या स्वाधीन करुन ताबा पावती घेतली होती. दरम्यान, दोन दिवसांनंतर हा हायवा ट्रक सोमवारी रात्री अचानक गायब झाला.
‘लक्ष्मी पूजनासाठी’ हायवा घेऊन जात आहे. पूजनानंतर हायवा परत आणून लावतो, असे वाळूमाफियाने पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना सांगितल्याचे समजते. मात्र, हायवा अद्याप पोलीस ठाण्यात आणण्यात न आल्याने पोलिसांचा जीव टांगणीला लागला आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक सतीशकुमार टाक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.