गुलमंडी सर्वात महाग, मिटमिटा, पडेगाव स्वस्त; छत्रपती संभाजीनगरात चारही दिशांमध्ये घर महागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:35 IST2025-04-02T15:28:30+5:302025-04-02T15:35:02+5:30

गुलमंडी व परिसर ‘हार्ट ऑफ दी सिटी,’ तर जालना रोड, सिडको परिसर, रेल्वे स्टेशन, गजानन महाराज मंदिर, बीड बायपास, चिकलठाणा, सातारा, पैठण रोड, गोलवाडी हा परिसर प्राइम लोकेशनमध्ये असल्याचे दिसते.

Gulmandi is the most expensive, Mitmita, Padegaon are the cheapest; Houses have become expensive in all four directions in Chhatrapati Sambhajinagar | गुलमंडी सर्वात महाग, मिटमिटा, पडेगाव स्वस्त; छत्रपती संभाजीनगरात चारही दिशांमध्ये घर महागले

गुलमंडी सर्वात महाग, मिटमिटा, पडेगाव स्वस्त; छत्रपती संभाजीनगरात चारही दिशांमध्ये घर महागले

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या चारही दिशांमध्ये घर, भूखंड, कार्यालय, दुकान घेणे महागले आहे. तसेच बांधकाम करणेही महागले आहे. तीन वर्षांनंतर शासनाने रेडीरेकनर दरांमध्ये १ एप्रिलपासून महापालिकेच्या हद्दीत ३.५३ टक्के वाढ केली असून, शहरातील सर्वांत महागडे परिसर गुलमंडी, निराला बाजार असल्याचे दरांच्या विवरण तक्त्यानुसार दिसते आहे. गुलमंडी व परिसर ‘हार्ट ऑफ दी सिटी,’ तर जालना रोड, सिडको परिसर, रेल्वे स्टेशन, गजानन महाराज मंदिर, बीड बायपास, चिकलठाणा, सातारा, पैठण रोड, गोलवाडी हा परिसर प्राइम लोकेशनमध्ये असल्याचे दिसते. शहर व परिसरात घर, जमीन घेण्यासाठी सामान्यांना जादा पैसे मोजावे लागतील. खुली जागा, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, तळमजला, शेती, जिरायती, संभाव्य बिनशेती, एनए असे दरांचे वर्ग आर. आर.मध्ये आहेत.

शहरात वर्गीकरण झोननिहाय
मुस्तफाबाद, उस्मानपुरा, इटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बनेवाडी, शहानूरवाडी, गुलमंडी, पैठणगेट, क्रांती चौक, रेल्वे स्टेशन, उस्मानपुरा, जवाहर कॉलनी, गजानन महाराज मंदिर परिसर, बीड बायपास, हर्सूल, बुढी लेन, रोशन गेट या भागांत वेगवेगळे दर आहेत.

बांधकामांचे दर
आरसीसी बांधकाम करण्यास २५ हजार ४१० रु. प्रति चौ.मी, अ वर्ग नगरपालिका हद्दीवरील वर्गानुसार २४१४०, तर ब, क वर्ग न.पा.; नगर पंचायती हद्दीत २२ हजार ८६९ रुपये आणि ग्रामीण भागातील प्रभावक्षेत्रात २०३२८ रुपये मोजावे लागतील.

बसणार खिशाला झळ
१ हजार स्क्वे. फुटांचा फ्लॅट गुलमंडीत घ्यायचा असेल व फ्लॅटची किंमत जर ७० लाख रुपये गृहीत धरली तर रेडी रेकनरच्या ३.५३ टक्के दरानुसार सुमारे २ लाख रु. जादा मोजावे लागतील. त्यावर मुद्रांक नोंदणीचा खर्च वेगळा असेल. जिरायत, बागायत शेती, गावठाण हायवेलगत, भविष्यात एन-ए होणाऱ्या जमिनींसाठी वेगवेगळे दर आहेत.

३० गावे प्रभावक्षेत्राखाली
बाळापूर, गांधेली, हनुमंतगाव, सहजापूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, गोलवाडी, गंगापूर नेहरी, दौलताबाद, रावरसपुरा, शेंद्रा खमंगर, सुंदरवाडी, फत्तेपूर, पिसादेवी, सावंगी, हिरापूर, झाल्टा, गेवराई, गेवराई तांडा, कुंभेफळ, लाडगाव, शेंद्राबन, वरूड काजी, गंगापूर जहाँगीर, करमाड, हिवरा, टोणगाव ही गावे प्रभावक्षेत्रात आहेत.

प्रति चौरस मीटर झोननिहाय दर

परिसर......................... जुने दर रु................. नवे दर रु.
क्रांती चौक ते स्टेशन प्लॉट : ४४८००................४९२८०

फ्लॅटचे दर..........................४६०००..............५०६००
जालना रोड ते सेव्हन हिल्स प्लॉट....५२०००........स्थिर

फ्लॅटचे दर .............................६५०००..........७१५००
गजानन महाराज मंदिर प्लॉट ...........३०४००........३३४००

फ्लॅटचे दर ...............................३८०००..........४१८००
गुलमंडी, निराला बाजार प्लॉट ........७६६००..........स्थिर

फ्लॅटचे दर ..............................८४२००........९२६२०
बीड बायपास प्लॉटचे दर ..............२४०००.......२४४९०

फ्लॅटचे दर ...........................४३०००.............४७७००
चिकलठाणा, जालना रोड प्लॉट ...२५९००.......२६२००

फ्लॅटचे दर ..................४००००...................४४०००
मिटामिटा, पडेगाव प्लॉट ......९५००..............१०२९०

फ्लॅटचे दर ........................ ३१५८०...........३४७४०
सिडको एन-१ व इतर प्लॉट दर... ४८२००..... ५०१५०

फ्लॅटचे दर ....................... ६६०००...........७००००

Web Title: Gulmandi is the most expensive, Mitmita, Padegaon are the cheapest; Houses have become expensive in all four directions in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.