मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा; बोगस कंपन्यांच्या नावे उचलली बिले, एक ताब्यात

By सुमित डोळे | Published: January 5, 2024 12:30 PM2024-01-05T12:30:39+5:302024-01-05T12:31:05+5:30

केंद्रीय जीएसटी पथकाची छत्रपती संभाजीनगरासह, लातूर, धाराशिवला कारवाई

GST scam worth crores in Marathwada; Bills raised in name of bogus companies, one detained | मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा; बोगस कंपन्यांच्या नावे उचलली बिले, एक ताब्यात

मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा; बोगस कंपन्यांच्या नावे उचलली बिले, एक ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : अस्तित्वातच नसलेल्या सिमेंट कंपन्यांच्या नावे कोटींची बिले उचलून मराठवाड्यात कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा झाला. यात सुमारे १०० ते १५० कोटींची अफरातफर झाली असून शहरातील एका व्यक्तीच्या नावे एक कंपनी दाखविण्यात आली होती. त्याला पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले.

सूत्रांच्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बोगस बिले दाखवली जात असल्याची माहिती केंद्रीय जीएसटी विभागाला मिळाली होती. यात लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमधील काही व्यावसायिकांनी जालना जिल्ह्यात ८ ते ९ सिमेंट विक्रीच्या बोगस कंपन्या स्थापन केल्याचा बनाव रचला. त्यातून पैसे उचलण्यासाठी रस्ते, पाणी पुरवठा योजना कंत्राटदारांना बोगस बिले दिली. याद्वारे त्यांनी सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक जीएसटी बुडवल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

अनेक सीएंची मदत
संबंधितांना जालना, छत्रपती संभाजीनगरमधील अनेक सीएंनी मदत केल्याचे सांगण्यात येत आहे. यांच्याकडून बोगस बिल घेतलेल्या कंत्राटदारांचा पथकाकडून शोध सुरू होता. दरम्यान, शहरातील एकाने संबंधित घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशांच्या उलाढालीचे व्यवस्थापन सांभाळले. ही मदत केल्याचे पुरावे पथकाला मिळाले होते. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अस्तित्वातच नसलेल्या सिमेंट कंपन्यांच्या नावाने बिले उचलली जात असताना कुठल्याच स्थानिक सरकारी विभागाला कळले कसे नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान अटकेसंबंधी स्थानिक पोलिसांकडून कुठलाही दुजोरा मिळाला नाही.

Web Title: GST scam worth crores in Marathwada; Bills raised in name of bogus companies, one detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.