शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम मतदारसंघात भाजपामध्ये गटबाजी

By admin | Updated: October 10, 2014 00:43 IST

औरंगाबाद : पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी प्रचारातून अलिप्त असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : पश्चिम मतदारसंघातून भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी प्रचारातून अलिप्त असल्याचे समोर आले आहे. उमेदवार मधुकर सावंत आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये जुन्या राजकारणातून वाद होत असल्यामुळे ते प्रचारात नाहीत, तर काही पदाधिकारी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झाले आहेत. प्रचारातून अलिप्त राहणाऱ्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना भाजपा उमेदवाराकडून धमकी सत्र सुरू असल्याची चर्चा भाजपाच्या गोटातून पुढे आली आहे. त्या धमक्यांना कुणीही दाद देत नसल्याचे दिसते आहे. सावंत दोन वेळा भाजपाकडून नगरसेवक राहिलेले आहेत. २०१० मध्ये त्यांनी पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवीत हॅट्ट्रिक केली.सावंत यांनी २०१० मध्ये बंडखोरी करून माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांचे चिरंजीव राजेंद्र गायकवाड यांना पराभूत केले होते. त्यामुळे गायकवाड यांचा कलही सावंत यांच्या बाजूने सध्या तरी दिसत नाही. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी अपक्षच अर्ज भरला होता. मात्र, महायुतीचा काडीमोड झाल्यामुळे त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. भाजपाकडून विजयराज साळवे यांना उमेदवारी हवी होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलले तर उपमहापौर संजय जोशी हे सध्या सावंत यांच्या प्रचारातून अलिप्त आहेत. २००८ सालच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत सावंत यांनी दिलेल्या त्रासामुळे जोशी प्रचारातून अलिप्त असल्याचे भाजपाच्या गोटातून समजले आहे. या प्रकरणी जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उमेदवार सावंत यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या स्वीय सहायकाने सांगितले की, भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी प्रचारात सहभागी आहेत. निवडणूक असल्यामुळे चुकीची माहिती पेरली जात आहे.