शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चाराटंचाईही गंभीर..!

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

ईट : पावसाळा सुरू होऊन एक महिना आणि दोन नक्षत्र संपत आले तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही.

ईट : पावसाळा सुरू होऊन एक महिना आणि दोन नक्षत्र संपत आले तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे ईट परिसरात पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली असून, २५ रूपये दर देऊनही कडब्याची पेंढी मिळत नसल्याने पशुपालकांनी आता कडब्याला पर्याय म्हणून उसाची निवड केल्याचे दिसत आहे.भूम तालक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. शिवाय तालुक्याचे बहुतांश क्षेत्र हे डोंगराळ असल्यामुळे चराऊ क्षेत्र मोठे आहे. तसेच रबी पिकाचा तालुका विशेषत: ज्वारीचे कोठार म्हणूनही ओळख असल्याने या तालुक्यात जनावरांसाठीचा कडबाही मुबलक उपलब्ध होतो. त्यामुळे या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दुधापासून खवा, खव्यापासून पेढा उत्पादन करणारी केंद्रे तसेच दूध संकलन केंद्रेही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यायाने दुभत्या जनावरांची संख्याही भरपूर आहे.यंदाच्या रबी हंगामात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच ज्वारीचा कडबा भिजून काळा पडल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्नही गंभीर निर्माण झाला आहे. वेळेवर पाऊस पडला तर हिरव्या चाऱ्याची निर्मिती करता येईल, या आशेवर शेतकरी होता. परंतु, यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यापाठोपाठ आता अद्रा नक्षत्रातील पाच दिवसही कोरडेच गेल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कडबा खरेदीसाठी पशुपालक गावोगावी फिरत असून, सध्या अडीच हजार रूपये प्रती शेकडा कडब्याची खरेदी केली जात आहे. जादा दर देऊनही कडबा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांनी आता शेतातील उसाचाच चारा म्हणून वापर करण्यास सुरूवात केली आहे. या भागात प्रतीगुंठा अडीच हजार रूपये दराने ऊस विकत घेतला जात असून, तोच जनावरांना चारा म्हणून दिला जात आहे. एकूणच पशुखाद्याने गगनाला भिडलेले भाव, चाऱ्याची टंचाई आणि पाण्याचा प्रश्न यामुळे या भागातील दुग्धव्यवसाय अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)