शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

छावण्या बनल्या ठेकेदारांसाठी कुरण

By admin | Updated: September 7, 2015 00:01 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दोन दिवसापूर्वी दुष्काळ दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर चमकोगिरी करत सुरू केलेल्या चारा-छावण्यांपैकी

व्यंकटेश वैष्णव , बीडदोन दिवसापूर्वी दुष्काळ दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर चमकोगिरी करत सुरू केलेल्या चारा-छावण्यांपैकी बहुतेक चारा-छावण्या गुंडाळल्याचा प्रत्यय रविवारी आला. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी रविवारी अचानक छावण्यांना भेट देऊन पंचनामा केला असता छावण्यांमध्ये बोटावर मोजण्या इतकीच जनावरे होती. मोठा गाजावाजा करत चारा छावण्या सुरू केल्या. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अचानक चारा-छावण्यांना भेट दिली असता, छावण्यावर कुठे वीस तर पंन्नास अशी जनावरे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला. बीड जवळील पालवण येथील चारा-छावणीचा अपवाद वगळता बहुतेक छावण्यांवर जनावरे नव्हते. जिल्हयात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे, म्हणून शासनाने जिल्ह्यात १७ चारा छावण्यांना मंजूरी दिली आहे. छावणी मंजूर करून घेण्यासाठी पुढाऱ्यांचे शिफारस पत्र जोडून मंजूरी मिळविली. एवढेच नाही तर काहींनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता. चारा-छावण्यांना मंजूरी मिळाल्या नंतर शासनाने दिलेल्या निकषाकडे चारा-छावणी चालक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र रविवारी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना पहावयास मिळाले.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशावरून बीडचे उप विभागीय अधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी व तहसीलदार अमोल कदम यांनी तालुक्यातील छावण्यांना रविवारी अचानक भेट देऊन छावण्यातील जनावरांची संख्या तपासली. बीड जवळील पालवण येथील चारा छावणी सोडता इतर कुठल्याच चारा-छावणीवर दोनशे पेक्षा जास्त जनावरे आढळून आले नाहीत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे चारा छावणी चालकांकडून पालन होत नसल्याचे चित्र आज तरी बीड जिल्हयातील चारा छावण्यांवर पहावयास मिळत आहे.सोमनाथ खताळ ल्ल बीडशनिवारी रात्री झालेल्या पावसाने चारा छावण्यांमध्ये तारांबळ उडाली. जनावरांसाठीचा चाराही भिजला आणि शेतकरी, जनावरेही पावसात झोडपले. रविवारी सकाळी भिजलेला चाराच जनावरांना वाटप केला जात होता. तीन हजार जनावरांना चारा वाटपासाठी वजनकाटा एकच असल्याने शेतकऱ्यांना वेटींग करावी लागली. शहरापासून जवळच असलेल्या पालवण येथील चारा छावणीत ‘लोकमत’ने रविवारी केलेल्या पाहणीत ही माहिती समोर आली. दोन दिवसांपूर्वीच या छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. छावणीमध्ये तीन हजाराहून अधिक जनावरे आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास छावणीला भेट दिली. रस्त्यावरच दोन निळ्या दिव्याच्या गाड्या उभ्या होत्या. तर दुतर्फा शेतकरी जनावरांना निवारा करण्यासाठी धडपडत होते. कोणी लाकडे बांधत होती तर कोणी पोत्याचं चवाळं त्यावर झाकत होते. उजव्या बाजुने छावणीत प्रवेश केला. प्रवेश करताच शनिवारी रात्री झालेल्या पावसाने रस्ता चिखलमय झाला होता. तर काही पदाधिकारी जनावरे मोजत होती. शेतकऱ्यांनी चारा घेण्यासाठी लावलेल्या लांबच्या लांब रांग याठिकाणी दिसून आल्या. दोन कर्मचारी ओळखपत्र बघून एक कुपण आणि त्यावर द्यावयाचा चारा (किलोमध्ये) लिहीत होता. एवढ्यात छावणी प्रमुख एस.एन.शेळके येथे आले. उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी आणि तहसीलदार अमोल कदम आले. त्यांनी लगेच रजिस्टर तपासायला सुरूवात केली. रात्रीच्या पावसाने उसाच्या चाऱ्याचा वास सुटला होता. हाच चारा जनावरांना वाटप केला जात होता. चारा वेळेवर मिळत नसल्याने जनावरांच्या दावणी चाऱ्याच्या प्रतिक्षेत होत्या. चारा घेण्यासाठी बैलगाड्यांच्या लांबलचक रांगा होत्या.रोज ८०० जनावरांची वाढयेथील छावणीत रोज ७०० ते ८०० जनावरांची वाढ होत आहे. आतापर्यंत ३ हजार १९० जनावरे दाखल आहेत. परिसरातील २३ गावातील शेतकऱ्यांनी जनावरे आणली आहेत. याठिकाणी घटसर्प व फऱ्या रोगाने ग्रासलेल्या १००८ जनावरांचे लसीकरण केल्याची नोंद पशुधन अधिकाऱ्यांकडे आहे.