शिवजयंतीचा 'रॉयल' थाट! छ. संभाजीनगरमध्ये हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या स्मारकांवर पुष्पवृष्टी

By बापू सोळुंके | Updated: February 19, 2026 19:46 IST2026-02-19T19:43:03+5:302026-02-19T19:46:14+5:30

हेलिकॉप्टरमधून शिवस्मारकांवर पुष्पवृष्टी करत अभिवादन होताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला

Grand Shiv Jayanti Celebration: Helicopter Flower Tribute at Kranti Chowk and Other Locations in Chhatrapati Sambhajinagar | शिवजयंतीचा 'रॉयल' थाट! छ. संभाजीनगरमध्ये हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या स्मारकांवर पुष्पवृष्टी

शिवजयंतीचा 'रॉयल' थाट! छ. संभाजीनगरमध्ये हेलिकॉप्टरमधून महाराजांच्या स्मारकांवर पुष्पवृष्टी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शहरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नवीन छत्रपती संभाजीनगर गणेश महासंघाच्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदा शहरातील प्रमुख शिवस्मारकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. आकाशातून होणारा हा फुलांचा वर्षाव आणि शिवरायांचा जयघोष यामुळे संपूर्ण शहर शिवमय झाले होते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

महत्त्वाच्या चौकात पुष्पवृष्टी
गुरुवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास या भव्य सोहळ्याला प्रारंभ झाला. खासदार संदीपान भुमरे, उत्सव समितीचे संस्थापक बबनराव डिडोरे आणि विद्यमान अध्यक्ष ज्योतिराम पाटील यांनी स्वतः हेलिकॉप्टरमध्ये बसून शिवरायांना अभिवादन केले. जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर, सिडको अविष्कार कॉलनी आणि शहरातील मुख्य केंद्र असलेल्या क्रांतीचौक येथील छत्रपतींच्या पुतळ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली.

क्रांतीचौकात शिवप्रेमींचा जल्लोष
विशेषतः क्रांतीचौक येथे सकाळी ११:३० ते ११:४८ या वेळेत जेव्हा हेलिकॉप्टरने घिरट्या घालत पुष्पवृष्टी केली, तेव्हा उपस्थित हजारो शिवप्रेमींनी एकच जल्लोष केला. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आकाशातून पडणाऱ्या फुलांच्या पाकळ्या आपल्या अंगावर घेण्यासाठी आणि हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

विविध कार्यक्रमांची रेलचेल
शहरातील विविध सार्वजनिक शिवजयंती उत्सव समित्यांच्या वतीनेही यंदा सामाजिक उपक्रम, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हेलिकॉप्टरमधून झालेली ही पुष्पवृष्टी यंदाच्या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण ठरली.

Web Title : शिव जयंती शाही अंदाज़ में: छत्रपति शिवाजी के स्मारकों पर हेलीकॉप्टर से फूलों की वर्षा

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में शिव जयंती धूमधाम से मनाई गई। छत्रपति शिवाजी के स्मारकों पर हेलीकॉप्टर से फूलों की वर्षा की गई, जिससे अद्भुत दृश्य बना। क्रांति चौक पर उत्साही लोगों ने आनंद मनाया। कई सांस्कृतिक और सामाजिक कार्यक्रम भी आयोजित किए गए, लेकिन हवाई फूलों की वर्षा आकर्षण का केंद्र बनी।

Web Title : Shiv Jayanti Celebrated Royally: Flowers Showered on Shivaji Memorials by Helicopter

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar celebrated Shiv Jayanti with fervor. A helicopter showered flowers on Shivaji memorials, creating a spectacle. Enthusiasts rejoiced at Kranti Chowk. Various cultural and social programs were also organized, but the aerial flower shower became the highlight.