शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारणाचे बिघडले गणित

By admin | Updated: March 27, 2015 00:24 IST

बीड : जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे

बीड : जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. परंतु सरपंच पदाचे आरक्षण न काढताच निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ ग्रामीण भागातील नागरिकांवर आली असल्याने गाव पातळीवरील राजकारणाचे मनसूभे उधळले आहेत. आरक्षणापूर्वीच निवडणुका होत असल्याने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १०६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर केला आहे. यापूर्वी अगोदर गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत असे व त्यानंतर निवडणुका लागत होत्या.मात्र यावेळी अगोदर ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत व त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संबंधीत गावाच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.विशेष म्हणजे बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३ दरम्यान आरक्षण जाहीर करण्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने घेतल्या असल्याचेही अधिकारी म्हणाले. (प्रतिनिधी)दुष्काळामुळे तीन महिने अगोदर निवडणुकाजिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे. सुमारे पाऊणे दोनशे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. येणाऱ्या काळात अजून पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका तीन महिने अगोदर जाहीर करण्यात आल्या असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.