शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत? उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे.

प्रश्न : महाराष्ट्रातच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त का आहेत?उत्तर : डॉ. आर. एस. देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रातला शेतकरी हा पूर्णत: सरकारवरच अवलंबून आहे. सरकारच आमचे सर्व काही करू शकेल, अशी मानसिकता येथील शेतकऱ्यांची झालेली आहे. जेव्हा परावलंबी माणूस हतबल होतो, तेव्हा त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. दुसरीकडे शेतीचा पोत कमी झालेला आहे. जमिनीची प्रतिकारशक्ती खालावलेली आहे. सिंचनक्षमता वाईट आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने सिंचनावर सर्वाधिक खर्च केलेला आहे. तरीसुद्धा मागील १०-११ वर्षांत अवघ्या १ टक्का एवढीच सिंचनात वाढ होऊ शकली, हे दुर्दैव. प्रश्न : आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना अपेक्षित आहे?उत्तर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर त्यांनी स्वत:चा मार्ग स्वत:च निवडण्याची मानसिकता केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी छोटे-छोटे गट स्थापन केले पाहिजे. त्यात सरकारचा होणारा हस्तक्षेप झुगारला पाहिजे. शेतमालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’ करण्याची ताकद वाढविली पाहिजे. पीक पद्धती बदलली पाहिजे. सरकारवर अवलंबून राहण्याची मानसिकता आता बदलली पाहिजे.प्रश्न : शेतकरी हा सतत भरडला जातो ?उत्तर : तो सर्वात जास्त भरडला जातो बाजारात. माल विकण्यासाठी जेव्हा शेतकरी बाजारात जातो. तेव्हा मालाच्या किमतीची ‘बार्गेनिंग’करण्यामध्ये शेतकरी कमी पडतो. शेतकऱ्याला मालाचा भाव ठरवता येत नाही. दुसरेच भाव ठरवतात. जणू काही शेतकरी हा भाव ठरवून घेण्यासाठीच असतो, अशी भावना बाजारातल्या दलालांची आणि अडत्यावाल्यांची झालेली आहे. जो पर्यंत शेतकरी हा आपल्या मालाचा भाव ठरवणार नाही, तोपर्यंत तो सक्षम होणारच नाही. प्रश्न : शेतीचे चुकलेले अर्थकारण आणि सरकारच्या धोरणाबद्दल आपण काय म्हणाल?उत्तर : महाराष्ट्रात शेतीचे अर्थकारण कोलमडलेले आहे. या राज्यात एखादे कृषी धोरण अमलात आणले असे वाटत नाही. अमुक एक पीकपद्धती वापरली पाहिजे, बाजार पद्धत विकसित केली पाहिजे, असे कुठेच दिसत नाही. शेजारचे राज्य असलेल्या कर्नाटकात आतापर्यंत ४ कृषी धोरणे अमलात आलेली आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात एकही धोरण अमलात आणले, असे मी ऐकलेले नाही. या राज्यात कृषी खात्याला गौण समजले जाते. पूर्वी ज्या राज्यात हरित क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख यांना ओळखले जायचे. त्यांनी स्वत: मागून कृषी मंत्रालय घेतले होते. आता ते बळजबरीने कोणाच्या तरी गळ्यात टाकले जाते.