शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरकारी दवाखाने नावालाच; शस्त्रक्रियेसाठी सव्वाशे किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:28 IST

नेत्रशस्त्रक्रियांसाठी ‘ओटी’च नाही, रुग्णांना शहरात आणण्याची नामुष्की

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील म्हणजे ग्रामीण भागांतील सरकारी दवाखाने ‘आंधळे’ आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण जिल्ह्यातील उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेत्र शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र शस्त्रक्रियागृहच (ओटी) नाही. परिणामी, १००-१२५ कि.मी. अंतराचा प्रवास करून रुग्णांना माेतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शहरातील जिल्हा रुग्णालय किंवा घाटी रुग्णालय गाठावे लागत आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथे उपजिल्हा रुग्णालये आहेत. त्याबरोबर जिल्ह्यात ११ ग्रामीण रुग्णालये आहेत. मात्र, या ठिकाणी शस्त्रक्रियागृह नसल्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियाच होत नाही. आजघडीला मोतीबिंदू शस्त्रक्रिया शहरातील सार्वजनिक विभागाच्या जिल्हा रुग्णालयात होत आहे. त्याबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या घाटी रुग्णालयातही या शस्त्रक्रिया होत आहेत. ग्रामीण भागातून रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी घाटी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात यावे लागते. कुणाला ८०-१०० किमीचा प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागांतून जिल्हा रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णवाहिका, तसेच वाहनांची व्यवस्था केली जाते. जिल्ह्यात २१ नेत्रचिकित्सा अधिकारी आहेत. ग्रामीण भागातील मोतीबिंदूच्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी शहरातील जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी प्राधान्याने काम करतात.

ग्रामीण भागात का होईना शस्त्रक्रिया?मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान काही जिल्ह्यांत इन्फेक्शन होऊन रुग्णांच्या डोळ्यांना इजा होण्याचे प्रकार झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शस्त्रक्रियाच बंद करण्यात आल्या. मात्र, स्वतंत्र शस्त्रक्रियागृह साकारल्यास या शस्त्रक्रिया ग्रामीण भागातही शक्य होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.

‘डेडिकेटेड ओटी’ आवश्यकमोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ‘डेडिकेटेड ऑप्थम ओटी’ आवश्यक आहेत. यापूर्वी इन्फेक्शनच्या घटनेमुळे ग्रामीण भागात या शस्त्रक्रिया बंद केल्या. मात्र, आता पैठण येथे नव्याने रुग्णालयाचे बांधकाम होत आहे. यासह जेथे नव्याने बांधकाम होईल, तेथे ‘डेडिकेटेड ऑप्थम ओटी’ प्रस्तावित करण्यात येत आहे. याबरोबरच लवकरच बन्सीलालनगर येथील मनपाच्या सेंटरमध्येही या शस्त्रक्रिया सुरू होतील.- डाॅ. अर्चना भडीकर, जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक

शस्त्रक्रिया सुरू करण्याचे नियोजनसध्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत नाही. मात्र, लवकरच वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नियोजन आहे.- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य