सरकारने पाच वर्षात जनतेचे केवळ हाल केले : अशोक चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:33 IST2019-02-07T19:33:06+5:302019-02-07T19:33:45+5:30

जनसंघर्ष यात्रा जरी संपला असला तरी भाजप सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचा संघर्ष सुरूच आहे.

Government has only teasing people in five years: Ashok Chavan | सरकारने पाच वर्षात जनतेचे केवळ हाल केले : अशोक चव्हाण 

सरकारने पाच वर्षात जनतेचे केवळ हाल केले : अशोक चव्हाण 

खुलताबाद (औरंगाबाद ) : महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ पडला असून लोकांना पिण्यासाठी पाणी हातला काम नाही जनहिताची कामे सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र क्रिकेट खेळण्यात मग्न आहेत. तसेच या सरकारच्या काळात जनतेचे केवळ हाल झाले आहेत अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथील सभेत केली. 

अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस सहा महिन्यात 121 विधानसभा मतदार संघात पोहोंचली. जनसंघर्ष यात्रा जरी संपला असला तरी भाजप सरकारच्या विरोधात कॉंग्रेसचा संघर्ष सुरूच आहे. येत्या निवडणुकीत हे सरकार खाली खेचू, अब दिल्ली दूर नही ! असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Web Title: Government has only teasing people in five years: Ashok Chavan