शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

'सरकार बदलले, निर्णय फिरला'; वर्कऑर्डरपर्यंत पोहोचलेली ग्रामविकासाची कोट्यवधींची कामे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 5:04 PM

Billions of rural development works reached to work order canceled in Aurangabad District रद्द कामे गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील कामे आहेत.

ठळक मुद्देमागील सरकारचा निर्णय धोरणात्मकरीत्या बदललामंजूर केलेली बहुतांश कामे वर्कआॅर्डरपर्यंत पोहोचलेली आहेत

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते व इतर विकासकामांची मागील सरकारने केलेली तरतूद या सरकारने रद्द केली आहे. यात जिल्ह्यातील सुमारे ५० कोटींहून अधिक रुपयांची कामे असल्याची माहिती पुढे आली आहे. सभागृह बांधणे, गावांतर्गत सिमेंट रस्ते करणे, पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांचा यामध्ये समावेश होता. 

मंजूर केलेली बहुतांश कामे वर्कआॅर्डरपर्यंत पोहोचलेली आहेत, तर काही कामांच्या निविदा होऊन ७० टक्के कामेही पूर्ण झाली आहेत. आता महाविकास आघाडी सरकारने जुन्या सरकारच्या काळातील कामांचा अध्यादेश रद्द करीत नव्याने कामांची तरतूद केल्यामुळे जुन्या कामांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, सिल्लोड, औरंगाबाद तालुक्यातील कामे आहेत. ही कामे बांधकाम, ग्रामविकास विभागांतर्गत होणार होती. मागील सरकारच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात २५:१५ चे अध्यादेश निघाले होते. आता नवीन कामे सरकारने दिलेली आहेत. 

न्यायालयात जाण्याची तयारी ग्रामविकासच्या हेडअंतर्गत २५:१५ ची कामे होती. ही कामे देण्यासाठी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांना विशेष अधिकार असतात. मागील सरकारच्या काळात ही कामे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी मंजूर केली होती. याबाबत न्यायालयात जाणार आहे, असे आ. प्रशांत बंब यांनी सांगितले.

२५ ते ३० टक्के कामांच्या निविदा शिल्लक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश देशपांडे यांनी सांगितले, २५:१५ अंतर्गत जी कामे होती, त्यात सभागृह बांधणे, नालीबांध करणे, सिमेंट रोड, पेव्हर ब्लॉक बसविण्याची कामे होती. काही कामांच्या निविदा झालेल्या आहेत. २५ ते ३० टक्के निविदा मध्यंतरीच्या एका आदेशामुळे राहिल्या आहेत.  

नवीन सरकारमुळे धोरणात्मक निर्णय राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, गेल्या सरकारच्या काळातील वर्कआॅर्डर न झालेली कामे रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. त्यानुसार नवीन ११०० कोटी रुपयांची कामे वाटली. मागील सरकारने सर्व लोकप्रतिनिधींना समान निधी दिला नव्हता. या सरकारने विरोधी आमदारांसह सर्वांना समान निधीचे वाटप २५:१५ मध्ये केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीRural Developmentग्रामीण विकासAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद