गुड न्यूज ! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात समृद्धी वाघिणीने दिला पाच बछड्यांना जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:40 IST2020-12-25T17:39:41+5:302020-12-25T17:40:41+5:30
Samrudhi tiger gave birth to five calves in Aurangabad या पाच बछड्यांमुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या १४ एवढी झाली आहे.

गुड न्यूज ! सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात समृद्धी वाघिणीने दिला पाच बछड्यांना जन्म
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने शुक्रवारी (ता. २५) पहाटे पाच बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या १४ एवढी झाली आहे. एप्रिल २०१९ मध्ये याच वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता. कोरोनामुळे हे उद्यान बंद असले तरी पर्यटकांसाठी मात्र ही गोड बातमी ठरली आहे.
संपूर्ण मराठवाड्यासाठी एकमेव असलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सर्वाधिक नऊ वाघ होते. त्यात आणखी पाच वाघांची भर पडली आहे. शुक्रवारी सिद्धार्थ-समृद्धी यांच्यापासून पाच बछड्यांचा जन्म झाला. पाचही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना पशुवैद्यकांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या पाच बछड्यांमुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या १४ एवढी झाली असल्याचे प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले.