शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मृगाने दिला दगा, आर्द्रातही ढगांकडे बघा...

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळ मृग नक्षत्रात झालेल्या सरासरी ५० मि.मी. पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात मान्सून वेळेवर आला.

एस.आर. मुळे , शिरूर अनंतपाळमृग नक्षत्रात झालेल्या सरासरी ५० मि.मी. पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यात मान्सून वेळेवर आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्साहात खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली, परंतु गेल्या आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला. तालुक्यात झालेला पाऊस अवकाळी होता, याची आता जाणीव झाल्याने ‘मृगाने दिला दगा, आता आर्द्रातही ढगांकडे बघा’ असेच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तर ‘पावसाळ्यात उन्हाळा अन् उन्हाळ्यात पावसाळा’ झाल्याने ऋतुचक्र बदलले की काय? अशी चर्चा शेतकऱ्यांतून केली जात आहे़मार्च महिन्यात सलग अठरा दिवस गारपीट झाली. त्यामुळे तालुक्यातील ४८ गावांतील रबी पिकांना फटका बसला़ एवढेच नव्हे, तर एप्रिल आणि मे महिन्यातसुध्दा तीन-चार वेळा मोठा वादळी पाऊस झाला़ विजा कोसळून अनेक गावांतील शेतकऱ्यांचे पशुधन दगावले़ परिणामी, उन्हाळ्यात पावसाळा अन् पावसाळ्यात उन्हाळा असेच वातावरण निर्माण झाले असल्याने ऋतुचक्र्र बदलले की काय, अशी चर्चा शेतकऱ्यांत सुरू झाली आहे़ त्यामुळे ऋतुचक्राचा अभ्यास करून संशोधन होणे गरजेचे आहे, अशी मागणीसुध्दा शेतकऱ्यांतून होत आहे़ मृग नक्षत्रात मान्सून वेळेवर येणार, अशी घोषणा सुरुवातीला हवामान खात्यासह पंचांगकर्त्यांनीही केली होती़ शिवाय चालू वर्षात समाधानकारक पाऊस होणार असल्याचेही सांगण्यात आले़ त्यातच मृग नक्षत्राच्या शेवटी तालुक्यात सरासरी ५० मि.मी. पाऊस झाला़ त्यामुळे दैठणा, येरोळ, सुमठाणा, शिरूर अनंतपाळ, साकोळ, तळेगाव, शेंद, तिपराळ, नागेवाडी, हणमंतवाडी, आनंदवाडी, तुरूकवाडी, रापका, लक्कडजवळगा, जोगाळा आदी निम्म्या तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला़ महागामोलाचे खते-बियाणे घालून ते उगवण्याची प्रतीक्षा करत आहेत़ पेरण्या होऊन आठ दिवस उलटले तरीही अनेकांचे बियाणे उगवलेच नाही़ त्यामुळे तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे़ पाऊस पडत नसल्याने फारशी माहिती नसूनही हवामानावर आधारित पीक विमा भरण्यासाठी शेतकरी सरसावल्याचे चित्र दिसत आहे.एकरी सहा हजार खर्च...तीन हजाराची सोयाबीन बॅग, तेराशेचा खत, एक हजार पेरणीचा खर्च आणि एक हजारांचे मजूर असा एकंदर एकरी सहा हजारापेक्षा अधिक खर्च शेतकऱ्यांचा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले असून, दुबार पेरणी कशी करायची, या विंवचनेत दिसत आहेत़तर पंचनामे करा... जून महिना संपला तरीही पाऊस पडत नसल्याने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून दुबार पेरणीसाठी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी एकरी दहा हजाराची मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे़