गिरनेरा तांड्यावर चार घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:37 IST2019-04-13T22:37:10+5:302019-04-13T22:37:25+5:30

गिरनेरा तांडा परिसरातील वाडीवस्तीवर शुक्रवार मध्यरात्रीनंतर २ ते ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री चार घरे फोडून दोन ते अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

 The Girnera broke four houses on the fray | गिरनेरा तांड्यावर चार घरे फोडली

गिरनेरा तांड्यावर चार घरे फोडली

चितेगाव : गिरनेरा तांडा परिसरातील वाडीवस्तीवर शुक्रवार मध्यरात्रीनंतर २ ते ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री चार घरे फोडून दोन ते अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.


अंकुश जाधव यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ८० हजार रुपये, पैठणी साड्या आदी ऐवज चोरुन नेला. दुसऱ्या घटनेत दिलदार आली बेग व त्यांचे बंधू असीफ आली यांच्या घरातून सोने,चांदीचे दागिने कपडे असा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी अजगर आली बेग यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिंदे, राठोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Web Title:  The Girnera broke four houses on the fray