मोतीबिंदू दूर करा फुकटात; छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात नेत्र संजीवनी अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:11 IST2025-09-19T20:11:12+5:302025-09-19T20:11:22+5:30

मोहिमेत पहिल्या दिवशी २० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Get cataracts removed for free; Eye Sanjeevani campaign at Chhatrapati Sambhajinagar District Hospital | मोतीबिंदू दूर करा फुकटात; छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात नेत्र संजीवनी अभियान

मोतीबिंदू दूर करा फुकटात; छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात नेत्र संजीवनी अभियान

छत्रपती संभाजीनगर : नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान ही विशेष मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ४० वर्षांवरील व्यक्तींची मोफत नेत्र तपासणी, दृष्टिदोष आढळून आलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप, संदर्भ सेवा देण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयात बुधवारी या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, डॉ. पद्मजा सराफ, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भडीकर, वरिष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी जिल्ह्यातील नेत्र रुग्णांचा शोध घेऊन जास्तीत जास्त उपचार व निदान करण्याबाबत सूचना केली. डॉ. अर्चना भडीकर यांनी मोतीबिंदू रुग्णांना मोफत चष्मा मिळणार असल्याने तपासणीचे आवाहन केले. डॉ. संतोष काळे यांनी या मोहिमेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमास डॉ. विभा भिवटे, डॉ. स्नेहल सूर्यवंशी, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रदीप पोळ, मेट्रन शुभांगी थोरात, कोमल धोत्रे, परिसेविका वृषाली डोईफोडे, डॉ. गौरी, डॉ. अश्वम, रश्मी चौधरी, सुनीता मस्के, आसिया शेख, अमोल साळवे, दत्तात्रय बढे, भारती काथार, योगेश सोनटक्के, मार्टिना भालतिलक, शिला तुपे, गिरीश भुजंगे, शंकर घोडके, आदी उपस्थित होते.

२० रुग्णांच्या शस्त्रक्रिया
मोहिमेत पहिल्या दिवशी २० रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
 

Web Title: Get cataracts removed for free; Eye Sanjeevani campaign at Chhatrapati Sambhajinagar District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.