शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गहिलोत दाम्पत्याचे संचालकपद केले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:47 IST

येथील नागनाथ अर्बन को-आॅप बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा झाली. सभेत बँकेचे संचालक शंभुसिंह गहिलोत यांच्या विरोधात अनेकांनी अक्षेपार्ह आरोप केल्याने सभा वादळी ठरली. गहिलोत दाम्पत्याचे सभासदत्व कायमचे रद्द करण्याचा ठराव झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नागनाथ अर्बन को-आॅप बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा झाली. सभेत बँकेचे संचालक शंभुसिंह गहिलोत यांच्या विरोधात अनेकांनी अक्षेपार्ह आरोप केल्याने सभा वादळी ठरली. गहिलोत दाम्पत्याचे सभासदत्व कायमचे रद्द करण्याचा ठराव झाला.रामाकृष्णा लॉज येथे शनिवारी सभेत ३१ मार्च २०१७ अखेरच्या लेखा परिक्षणातील ताळेबंद व नफा-तोटा पत्रकास मान्यता दिली. कामकाजाच्या विषय पत्रिकेवर एकूण १२ विषय होते. त्यामध्ये विषय क्र. ९ वरील चर्चा चांगलीच गाजली. संचालक व सभासदांनी शंभूसिंह गहिलोत यांच्याविरुध्द असलेल्या तक्रारींचा पाढा वाचला. गहिलोत वारंवार बँकेसंदर्भात लेखी तक्रारी करतात. आत्तापर्यंत त्यांनी ६० च्यावर तक्रार अर्ज केल. बँकेच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचविण्याचे काम सातत्याने करीत असल्याने या बँकेची प्रतिमा त्यांच्या तोंडून मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. बँक कधीच तोट्यात नसताना ते सतत तोट्यात असल्याच्या लेखी व तोंडी तक्रारी करतात. त्यामुळे शंभुसिंह गहिलोत व मंगला गहिलोत यांचे कायमस्वरुपी पद रद्द करण्याची मागणी सभासदांनी लावून धरली. या तीव्र भावनांची दखल घेत सभेचे अध्यक्ष देशमुख यांनी त्यांचे प्राथमिक सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव मतदानासाठी ठेवला असता हा प्रस्ताव एकमताने पारित केला. सभेत झालेल्या चर्चेत बँकेचे उपाध्यक्ष सिंधुताई सरनाईक, संचालक बाळासाहेब आरळकर, दिलीप चव्हाण, अ‍ॅड. महेश बियाणी, बापूराव बांगर, मनोज आखरे, विनोद बोंढारे, खंडेराव सरनाईक, कवटे हजर होते.अपील करणार-गहिलोतयाबाबत शंभूसिंह गहिलोत यांनी सहकारमंत्री तसेच सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. बँकेचे पाच हजार सभासद असताना केवळ दोनशे ते पाचशे लोकांना बोलावले होते. त्यातले अनेक तर संचालकच नव्हते. त्याचे चित्रिकरणही झाले आहे. त्याद्वारे मी माझी बाजू मांडून संचालकपदासाठी पुन्हा दावा करणार असल्याचेही गहिलोत यांनी सांगितले.