छ. संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकीच्या प्राचीची भरारी! ॲमेझॉनमध्ये मिळाले ४५ लाखांचे पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:10 IST2026-04-08T16:08:27+5:302026-04-08T16:10:02+5:30

GECA च्या इतिहासात पहिल्यांदाच 'सेमिस्टर स्वॅप'; विद्यार्थिनीच्या करिअरसाठी महाविद्यालयाने मोडले जुने नियम.

GECA Student Prachi Gatlewar Bags 45 LPA Package at Amazon in Chhatrapati Sambhajinagar | छ. संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकीच्या प्राचीची भरारी! ॲमेझॉनमध्ये मिळाले ४५ लाखांचे पॅकेज

छ. संभाजीनगर शासकीय अभियांत्रिकीच्या प्राचीची भरारी! ॲमेझॉनमध्ये मिळाले ४५ लाखांचे पॅकेज

छत्रपती संभाजीनगर: येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (GECA) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संगणकशास्त्र व अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी प्राची गटलेवार हिची जगप्रसिद्ध 'ॲमेझॉन' कंपनीत ४५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. प्राचार्य डॉ. संजय डंभारे यांनी या यशाची अधिकृत माहिती दिली. विशेष म्हणजे, प्राचीची ही संधी हुकण्याची शक्यता असताना महाविद्यालयाने घेतलेल्या एका ऐतिहासिक शैक्षणिक निर्णयामुळे तिला हे यश गाठता आले आहे.

'सेमिस्टर स्वॅप'चा ऐतिहासिक निर्णय
प्राचीला ॲमेझॉन कंपनीने सातव्या सत्रात (7th Semester) असतानाच सहा महिन्यांच्या इंटर्नशीपची ऑफर दिली होती. मात्र, महाविद्यालयाच्या नियमानुसार केवळ आठव्या सत्रातच इंटर्नशीपला जाण्याची मुभा असते. ही तांत्रिक अडचण प्राचीच्या करिअरमध्ये मोठा अडथळा ठरू शकली असती. मात्र, संगणकशास्त्र विभाग आणि विद्या शाखा परिषदेने विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन 'सेमिस्टर स्वॅप'चा (सत्र अदलाबदल) ऐतिहासिक पर्याय उपलब्ध करून दिला. यामुळे प्राचीला सातव्या सत्रातच इंटर्नशीपला जाता आले आणि तिने तिथे आपल्या कौशल्याने नोकरी पक्की केली.

महाविद्यालयाकडून विशेष सन्मान
प्राचीने मिळवलेले हे यश महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संजय डंभारे, विभागप्रमुख डॉ. विकुल पवार आणि इतर वरिष्ठ प्राध्यापकांच्या उपस्थितीत प्राचीचा विशेष सत्कार करण्यात आला. "विद्यार्थ्यांना जागतिक संधी मिळवून देण्यासाठी महाविद्यालय नेहमीच नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन प्रयत्नशील असते," असे मत प्राचार्य डंभारे यांनी यावेळी व्यक्त केले. प्राचीला मिळालेल्या या भरघोस पॅकेजमुळे शैक्षणिक वर्तुळात तिचे मोठे कौतुक होत आहे.

Web Title : जीईसीए की प्राची की ऊंची उड़ान: अमेज़ॅन में ₹45 लाख का पैकेज!

Web Summary : जीईसीए, छत्रपति संभाजीनगर की प्राची गटलेवार को अमेज़ॅन में ₹45 लाख का पैकेज मिला। एक अद्वितीय 'सेमेस्टर स्वैप' ने उन्हें जल्दी इंटर्न करने की अनुमति दी, जिससे उन्हें सफलता मिली। कॉलेज ने उनकी उपलब्धि का जश्न मनाया।

Web Title : GECA's Prachi Soars: Lands ₹45 Lakh Package at Amazon!

Web Summary : Prachi Gatlewar from GECA, Chhatrapati Sambhajinagar, secured a ₹45 lakh Amazon package. A unique 'semester swap' allowed her to intern early, leading to her success. The college celebrated her achievement, highlighting their commitment to student opportunities.