छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसने घेतला पंधरा वर्षीय मुलाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:48 IST2025-03-18T11:46:29+5:302025-03-18T11:48:20+5:30

या मुलाचा एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

GBS kills 15-year-old boy in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसने घेतला पंधरा वर्षीय मुलाचा बळी

छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसने घेतला पंधरा वर्षीय मुलाचा बळी

- संतोष हिरेमठ

छत्रपती संभाजीनगर :  गुलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या  आजाराने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यश नितीन हिवराळे (रा. पैठण गेट) असे मयत मुलाचे नाव आहे. या मुलाचा एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

अशक्तपणा आणि गिळायला, अशक्तपणा असा त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल झाला. रुग्णालयात दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तो व्हेंटिलेटरवर गेला. जवळपास दोन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर सोमवारी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मदतीने कुटुंबीयांवर एकच दुःखाचे डोंगर कोसळले.

यशच्या मृत्यूनंतर त्याच्या मित्रमंडळींसह शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी जीबीएससारख्या आजारांबाबत अधिक जागरूकता आणि वेळीच निदान होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली आहे.

या घटनेने दुर्लक्षित दुर्मीळ आजारांविषयी पुन्हा एकदा गंभीर विचार करण्याची वेळ आणली आहे. यशसारख्या निरागस चेहऱ्यांवर अशी वेळ येऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

जीबीएस म्हणजे काय?
गुलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मीळ पण गंभीर आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार प्रणालीच नसा आणि स्नायूंवर आघात करते. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि काही प्रकरणांमध्ये श्वास घेणेही कठीण होते. या आजारावर तातडीने योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.

Web Title: GBS kills 15-year-old boy in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.