शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांवर गावगुंड पोलिसांच्या ‘हीटलिस्ट’वर !

By admin | Updated: October 14, 2014 00:34 IST

बीड : विधानसभा निवडणुक व लोेकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत

बीड : विधानसभा निवडणुक व लोेकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. तब्बल दोन हजार आरोपी नजरकैदेत असून त्यांना केवळ मतदानापुरतेच घराबाहेर पडता येणार आहे.बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया करुन गुन्हेगारांवर जरब बसवली आहे. याशिवाय मतदान केंद्र आवारात थांबून मतदारांवर दहशत निर्माण करु पाहणाऱ्या गुंडांवरही पोलिसांचा ‘वॉच’ राहणार आहे. जिल्ह्यात २१६५ इतके मतदान केंद्रे आहेत. १८ लाख १७ हजार ७७९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदान प्रक्रिया निर्धोक वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. मतदानासाठी येणाऱ्या मतदारांवर दबाव टाकणे, मारहाण करणे, धमकावणे असे प्रकार होऊ नयेत यासाठी गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पोलिस करडी नजर ठेवणार आहेत. मारामारी, गुंडागर्दी, खून, बलात्कार, दरोडे, चोऱ्या, प्राणघातक हल्ला अशा प्रकरणांमधील दोन हजाराहून अधिक आरोपी नजरकैदेत राहणार आहेत. त्या सर्वांना केवळ मतदानासाठी घराबाहेर पडता येईल. मतदान झाल्यावर त्यांना पुन्हा घरात येऊन बसावे लागेल. याउपरही कोणी नियमबाह्यपणे घराबाहेर आढळल्यास त्याला जेरबंद केले जाईल. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली आहे़४मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. स्थानिक पोलिसांच्या जोडीला बाहेर राज्यातील पोलिस राहणार आहेत. संवेदनशील मतदानकेंद्रांवर जादा बंदोबस्त राहील.४मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडून जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.मतदान सुरु असताना गडबड, गोंधळ करण्याचा प्रयत्न केला किंवा तसा संशय जरी आला तरी पोलिस कुठल्याहीक्षणी संबंधितास उचलतील. मतदान केंद्र आवारात १४४ कलम लागू राहील. त्यामुळे शंभर मीटरच्या आवारात मतदानाव्यतिरिक्त प्रवेश राहणार नाही. मतदानकेंद्राबाहेर देखील पोलिसांची प्रत्येक हालचालींवर करडी नजर राहणार आहे.मतदानप्रक्रिया सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी योग्य उपाययोजना केल्या आहेत. ४पोलिस प्रशासन कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज आहे. ४मतदानवेळी कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर गय केली जाणार नाही.४मतदानकेंद्रांवरील हालचाली टिपण्यासाठी साध्या वेशातील पोलिस राहणार आहेत. शिवाय चित्रीकरणही होणार आहे, असे ते म्हणाले.