शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Ganpati Festival : लोकजीवनाचे समृद्ध दर्शन घडविणारे मेळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:09 IST

१९५३-५४ च्या काळात बहराला आलेल्या मेळा संस्कृतीने शहरातील सांस्कृतिक चळवळीला नवे वळण दिले आणि अनेक कलाकार घडविले.

- रुचिका पालोदकर

१९५३-५४ च्या काळात बहराला आलेल्या मेळा संस्कृतीने शहरातील सांस्कृतिक चळवळीला नवे वळण दिले आणि अनेक कलाकार घडविले. लोकजीवनाचे समृद्ध दर्शन या मेळ्यांतून घडायचे. लोकजीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे ते संस्कारपीठ होते, असे मेळे बघणारे प्रत्यक्षदर्शी किंवा मेळ्यामध्ये काम केलेले अनेक कलाकार सांगतात. आजही गणेशोत्सव आनंदात, जल्लोषात साजरा होतो; पण या उत्साहाला मेळ्यांची सर नाही, अशी प्रतिक्रियाही काही जुनी-जाणती मंडळी देतात. 

मेळ्यात काम केलेले काही कलाकार याबद्दल माहिती देताना सांगतात की, १९७० नंतर झपाट्याने बदलत गेलेल्या राजकीय परिस्थितीमुळे मेळेसंस्कृती बदलत गेली. गणेशोत्सवालाच हळूहळू राजकीय रूप येऊ लागल्यामुळे पैसा, सत्ता यांचे वर्चस्व मंडळात दिसू लागले आणि इथपासूनच मेळ्यांना उतरती कळा लागली.

सराफा परिसरातील सुवर्णकार मेळा, गुलमंडी परिसरातील मराठा हायस्कूलमधील झंकार मेळा, नवरंग, संगम, गणेश, वीर भारत आणि भीमदर्शन हे त्याकाळचे काही प्रसिद्ध मेळे होते. यापैकी भीमदर्शन मेळा आजही सुरू असून, मेळ्याचे हे ६८ वे वर्ष आहे. शहागंज, गुलमंडी या मुख्य चौकातील गणेश मंडळांमार्फत मेळ्यांचे संमेलन चालायचे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शाहगंज, गुलमंडी, चेलीपुरा, दानाबाजार, छावणी येथे मेळ्यांचे सादरीकरण व्हायचे. प्रत्येक मेळ्याला एक तासाचा वेळ दिला जायचा. 

व-हाडकार लक्ष्मण देशपांडे, पं. राजा काळे, डॉ. रूपमाला पवार, संगीतकार गौतम आहेरकर, कल्पना आहेरकर, प्रा. डॉ. सुधीर जहागीरदार, विजया वर्मा, त्र्यंबक महाजन, खंडेराव तोडकर, रमेश जयस्वाल, मुरलीधर गोलटगावकर, बाळकृष्ण जोशी, बजरंगलाल शर्मा, रंगनाथ महिंद्रकर, भीमराव कुलकर्णी, वसंतराव कुलकर्णी, विनायकराव पाटील, गजल गायक शेख मुख्तार ही त्या काळी मेळ्यात काम करणारी काही प्रसिद्ध मंडळी होती. मेळे म्हणजे त्याकाळच्या लहान मुलांसाठी ‘ट्रेनिंग सेंटर’ असायचे. संगीत, नृत्य, नकला यापैकी मुलाला कशामध्ये कल आहे, हे पाहून मोठी मंडळी लहानग्यांना तयार करायची. कोणताही भेदभाव न करता सगळ्या जातींची, धर्माची मंडळी एकत्र येऊन मेळ्यांमध्ये समरस होऊन काम करायची. मेळे म्हणजे खऱ्या अर्थाने समरसतेचा रंगमंच होता, अशी भावनाही कलाकारांनी व्यक्त केली. 

गणेश मेळ्याच्या आठवणी-त्याकाळी चालणाऱ्या मेळ्यांमुळे गणेशोत्सवाची मजा काही न्यारीच होती, असे भाऊसाहेब पुजारी यांनी सांगितले. औरंगपुरा परिसरात त्या क ाळी मोजके चार ते पाच गणपती असायचे. संपूर्ण शहरात मिळून १० ते १२ मेळे होते. भाऊसाहेब गजानन गणेश मेळ्यात तबला वादक म्हणून काम करायचे. याविषयी सांगताना ते म्हणाले की, साधारण एक महिना आधीपासून तालमीला सुरुवात व्हायची. नाथ मंदिराच्या भोवताली त्यावेळी पटांगण होते. या पटांगणातच तालमी चालायच्या. तबला, पेटी, बुलबुल तरंग, बासरी या वाद्यांच्या साह्याने मेळ्यात आम्ही गाणी सादर करायचो. गणेशोत्सवाच्या काळात रोज रात्री गाण्यांचे बहारदार सादरीकरण व्हायचे आणि सामान्य नागरिकांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक