घरात चहा करताना गॅस सिलिंडरचा स्फोट; मुलाचा मृत्यू, आई भाजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:23 IST2025-04-29T16:23:02+5:302025-04-29T16:23:22+5:30
आईला उपचारासाठी तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल

घरात चहा करताना गॅस सिलिंडरचा स्फोट; मुलाचा मृत्यू, आई भाजली
सिल्लोड : घरात चहा करताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत एका १८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला असून या तरूणाची आई भाजली आहे. ही घटना तालुक्यातील पिंपळगाव घाट येथे रविवारी ( दि.२७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. रुद्र अंबादास खेबडे असे मयताचे नाव आहे.
पिंपळगाव घाट येथील रुद्र अंबादास खेबडे हा रविवारी सायंकाळी त्याच्या घरात गॅसवर चहा करीत होता. यावेळी गॅस लिकेज झाल्याने अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. यात रुद्र जागीच ठार झाला तर व त्याची आई किरकोळ भाजली. घटनेनंतर उपस्थितांनी रुद्र आणि त्याच्या आईला उपचारासाठी तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रुद्रला मृत घोषित केले. त्याच्या आईवर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास हवालदार अनंत जोशी करीत आहेत.