गॅस कटरने एसबीआयचे एटीएम फोडले, बँकेच्या नियंत्रण कक्षाला कळलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:55 IST2025-06-19T16:47:09+5:302025-06-19T16:55:01+5:30

पोलिसांना नऊ तासांनी कळविली घटना, नांदेडमध्येही रात्रीतून एटीएम फोडले

Gas cutter breaks SBI ATM, bank's control room doesn't even know | गॅस कटरने एसबीआयचे एटीएम फोडले, बँकेच्या नियंत्रण कक्षाला कळलेच नाही

गॅस कटरने एसबीआयचे एटीएम फोडले, बँकेच्या नियंत्रण कक्षाला कळलेच नाही

छत्रपती संभाजीनगर : शटर बंद करून आत गॅस कटरच्या साहाय्याने, पडेगाव-मिटमिट्यातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडून चोरांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली. बुधवारी पहाटे ३:३० वाजता ही घटना उघडकीस आली.

गेल्या काही वर्षांत सातत्याने निर्मनुष्य परिसरातील, महामार्गावरील एटीएम सेंटरला चोरांकडून लक्ष्य केले जात आहे. यापूर्वी पडेगाव रस्त्यावरील एटीएम फोडण्यात आले. मात्र, संबंधित कंपन्यांकडून सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. पडेगावच्या तारांगण फाट्याजवळ आतील भागात एसबीआयचे एटीएम सेंटर आहे. पहाटे ३:३० वाजता चोरांनी आत प्रवेश करून शटर बंद केले. गॅस कटरने नोटांचे ट्रेजच बाहेर काढत जवळपास दोन ते तीन लाख रुपये रोख लंपास केली. या प्रकरणी संबंधित कंपनीचे अधिकारी, नांदेड येथेही एटीएम फोडल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी तिकडे गेले आहेत. तिकडे गुन्हा दाखल करून ते तक्रार देण्यासाठी येतील असे कंपनीने छावणी पेालिसांना कळविले.

सेन्सर वाजलेच नाही
छावणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणी पोलिसांना एटीएम फोडल्याचे बँकेकडून दुपारी १२:३० वाजता कळविण्यात आले. बँकेच्या मुंबईतील नियंत्रण कक्षात एटीएम सेंटरमधील सेंसर वाजलेच नाही. परिणामी, एटीएम फोडले जात असताना कोणाला कळलेच नाही. सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरांचा शोध सुरू असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

Web Title: Gas cutter breaks SBI ATM, bank's control room doesn't even know